‘लखपती दीदी’ मेळाव्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जळगावात दाखल

जळगाव :- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे ‘लखपती दीदी’ मेळाव्यासाठी आज जळगाव विमानतळावर आगमन झाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या स्वागत प्रसंगी राज्याचे मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एमसीव्ही महेश्वर रेड्डी आदी मान्यवर उपस्थित होते. विमानतळ स्वागतानंतर त्यांनी तेथे उपस्थित लखपती दीदींशी संवाद साधला. त्यानंतर त्यांचे लखपती दीदी संमेलन स्थळी आगमन झाले.

प्रधानमंत्र्यांच्या आगमनापूर्वी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांचे जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यांचे स्वागत नाशिक विभागीय आयुक्त प्रविण गेडाम यांनी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. याप्रसंगी त्यांच्या समवेत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही स्वागत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले‌.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आर्थिक सक्षमीकरणासोबत महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Mon Aug 26 , 2024
▪️ अडीच हजार कोटी रुपयांच्या फिरत्या निधीचे वितरण ▪️पाच हजार कोटींची बॅंक कर्जे वितरित ▪️लखपती दीदी संमेलनाला हजारो महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  जळगाव :- भारताची वाटचाल विकसित देशाकडे सुरू असून २०४७ पर्यंत आपल्याला हे लक्ष्य गाठावयाचे आहे. हे लक्ष्य साधताना देशातील प्रत्येक महिलेच्या सुरक्षिततेसोबतच आर्थिक सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. महिलांच्या सर्वांगीण प्रगतीमुळे आपण विकसीत भारताचे ध्येय नक्कीच गाठू, असा विश्वास […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!