बृहस्पति मंदीराच्या पुजाऱ्याची आदिवासी महिलेला मारझोड

संदीप बलवीर प्रतिनिधी

टाकळघाट :- टाकळघाट येथून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या हिंगणा तालुक्यातील चौकी येथील रहिवासी असलेल्या आदिवासी महिलेला बृहस्पति मंदीरात पुजारी असलेल्या व्यक्ती ने क्षुल्लक कारणावरून मारहाण केली.

आदिवासी वृध्द महिलेच्या तक्रारीवरून हिंगणा नागपूर शहर पोलीसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून कोर्टात दाद मागण्याचा सल्ला दिला.

सविस्तर वृत्त असे की कांताबाई देवराव आत्राम वय ६० वर्षे राहणार चौकी बृहस्पति मंदीराच्या समोर,सदर महिलेचे मंदिरा लगत पुजेच्या साहित्याचे दुकान आहे,तर आरोपी हा मंदिरात पुजारी म्हणून काम पाहतो तसेच मंदिर व्यवस्थापनाने त्याला एक दुकानाचे गाळे सुध्दा दिले आहे.दिनांक ०३/१०/२०२३ सकाळी ९ वाजता मंदिर परिसरात असलेली माकडं कांताबाई यांच्या दुकाना समोर आली असता त्यांनी ती माकडं हुसकावून लावली,तु माकडांना कशाला हाकलून लावते असे म्हणत आरोपी कपिल मिश्रा याने कांताबाई यांचेशी वाद घातला व हातबुक्क्याने मारहाण केली.

हिंगणा पोलीसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली असून कांताबाई यांना कोर्टात दाद मागण्याचा सल्ला दिला.

विशेष बाब म्हणजे कांताबाई यांच्या पतीने मंदिरासाठी पाच एकर जमीन दान दिल्याचे समजते आरोपी कपिल मिश्रा हा परप्रांतीय असुन मंदिर व्यवस्थापनाने त्याला पुजारी म्हणून काम दिले आहे मिश्रा हा नेहमीच इतरांसोबत क्षुल्लक कारणावरून वाद घालत असतो असेही समजते,जुनगड येथील मुकेश नारायण बोटरे यांचे सोबत मिश्राने वाद घालत मारहाण केली असल्याचे सांगण्यात आले जेंव्हा गावातील नागरिक त्याला जाब विचारण्यासाठी आले असता तो पंधरा दिवस मंदिर परिसरात आलाच नव्हता.सदर घटनेमुळे आदिवासी सामाजिक संघटना दुखावल्या असून ते नागपूर शहर पोलीस आयुक्त यांची भेट घेणार असून तेथे तक्रार दाखल करणार आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मृत्यू हे अंतिम सत्य तर देहादान हे सर्वश्रेष्ठ दान - डॉ.प्रा.सुशील मेश्राम

Mon Oct 16 , 2023
संदीप बलवीर,प्रतिनिधी # लामसोंगे परिवाराने केले अवयव व देहादान # विश्वशांती सामाजिक संस्थेचा पुढाकार # महिन्याभरात बुटीबोरी परिसरातील तिसरे अवयव व देहादान नागपूर :- मनुष्यप्राणी जन्माला आला म्हणजेच तो कधीतरी मरणारच. मग मरणानंतर त्याला मातीत पुरले किंवा जाळून टाकले तरी त्याचा मानवीसमाजाला काहीच फायदा नाही.त्यामुळे त्यांना मातीत पुरण्यापेक्षा किंवा जाळन्यापेक्षा त्याचे अवयव व देहादान केल्याने गरजू व्यक्तीला जर नवजीवन मिळत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com