आज बसपाने आंबेडकर भवनासाठी महिला आंदोलन कर्त्यांना समर्थन देऊन शासनाच्या विरोधात निदर्शने केली 

नागपूर :- महाराष्ट्र शासनाच्या दिशा निर्देशानुसार जुलै 2021 ला अंबाझरी येथील ऐतिहासिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जमीनदोस्त करण्यात आले. विविध पक्षाची ओरड झाल्याने नगर विकास खात्याने 24 ऑगस्ट 22 रोजी अधिसूचना जाहीर करून त्यावर हरकती मागविल्या. बसपाने 26 सप्टेंबरला आपली लेखी हरकत नोंदवली. त्यावर 23 नोव्हेंबरला नगररचना विभागात सुनावणी सुद्धा झाली. त्याचा अजूनपर्यंत अहवाल आलेला नाही. बसपा ने जिल्हाधिकाऱ्या सहित अनेक संबंधितांना 15 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर, 23 डिसेंबर 22 आदि तारखांना निवेदने दिली. मोर्चा सुद्धा काढला. परंतु शासनाचा अजूनपर्यंत या जागेसंदर्भात अहवाल आलेला नाही.

अंबाझरी उद्यान परिसरातील 20 एकर जागा आंबेडकर सांस्कृतिक भवनसाठी राखीव ठेवावी. त्यावर आंबेडकर सांस्कृतिक भवन, भव्य लायब्ररी, वस्तुसंग्रहालय, कॅन्टीन, ऑडिटोरियम, वाहन पार्किंग, गार्डन आदिसाठी ही 20 एकर जागा आरक्षित ठेवावी. तिथे भवन बांधून द्यावे व हे भवन तोडणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, ही बसपाची अनेक दिवसाची मागणी आहे.

या मागणीसाठी नागपुरात मागील वीस दिवसापासून सुरू असलेल्या फुले, शाहू, आंबेडकरी विचारांच्या महिलांच्या लक्षवेधी आंदोलनाला बसपाने लिखित पाठिंबा देऊन तत्कालीन सेना-काँग्रेस सरकारचा व आजच्या भाजप-सेना आघाडी सरकारचा बसपाने निषेध केला आहे. आजचे बसपाचे धरणे व सरकारचा निषेध आंदोलन नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, शहराध्यक्ष सादाब खान यांच्या नेतृत्वात व महाराष्ट्र प्रदेश बसपाच्या सचिव रंजना ढोरे, विजय कुमार डहाट, प्रदेश मीडिया प्रभारी उत्तम शेवडे, उत्तर प्रदेशचे माजी सांस्कृतिक मंत्री यशवंत निकोसे, नागपूर जिल्ह्याचे प्रभारी राहुल सोनटक्के, शहर प्रभारी विकास नारायने, ओपुल तामगडगे, माजी नगरसेवक संजय जयस्वाल, अजय डांगे, कविता लांडगे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. धरणे व निदर्शने आंदोलनाचे सूत्रसंचालन जिल्हा उपाध्यक्ष अमित सिंग यांनी तर समारोप जिल्हा सचिव अभिलेश वाहाणे यांनी केला.

या प्रसंगी उत्तर नागपूर विधान सभेचे अध्यक्ष जगदीश गजभिये, पश्चिम नागपूर विधानसभे चे अध्यक्ष सनी मून, मध्य नागपूर विधानसभे चे अध्यक्ष प्रवीण पाटील, दक्षिण नागपूरचे नितीन वंजारी, दक्षिण-पश्चिम चे सदानंद जामगडे, पूर्व नागपूरचे सचिन मानवटकर, हिंगणा विधानसभेचे प्रणय मेश्राम, कामठी विधानसभेचे सुनील बारमाटे,

तसेच महिला नेत्या सुनंदा नितनवरे, वर्षा सहारे, बबीता डोंगरवार, शहर उपाध्यक्ष सुमंत गणवीर, माजी शहराध्यक्ष महेश सहारे, माजी शहर प्रभारी शंकर थुल, विशाल गोंडाणे, चंद्रगुप्त रंगारी, राजेश बघेल, संभाजी लोखंडे, मॅक्स बोधी, विलास मून, संजय मेश्राम, ईश्वर सरोदे, चंद्रकांत रंगारी, जितेंद्र पाटील, वीरेंद्र कापसे, अनंता राऊत, भानुदास ढोरे, दयाशंकर कांबळे, अनिल मेश्राम, सुधाकर सोनपिपळे, निधान सरदार, चंद्रसेन पाटील, आनंद लांडगे, कल्पना वंजारी, सुनंदा शेलारे, अनिता लोखंडे, विमल वराडे, आदी प्रमुख कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सर्वधर्म समभाव संघठन ने पोलीस निरीक्षक का अभिनंदन किया.

Mon Feb 13 , 2023
कन्हान :- कन्हान पोलीस स्टेशन में आये नव नियुक्त पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर का सर्वधर्म समभाव संघठन ने पुष्प गुच्छ देकर हार्दिक अभिनंदन किया. साथ ही राष्ट्र पिता महात्मा गांधी की फोटो भेट स्वरूप प्रदान की गई. सर्वधर्म समभाव संघठन के प्रमूख चंदन मेश्राम ने संपूर्ण थाना परीक्षेत्र मे शांती, सदभावना, शांती सुव्यवस्था, अमन, चैन, भाई चारा का प्रसार होता […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com