बैलगाडी शर्यतीचे स्वागत : उत्तम शेवडे 

नागपूर :-पूर्वीपासून चालत आलेला ग्रामीण मधील शंकरपट (बैलगाडी शर्यत) यावर हायकोर्टाने घातलेली बंदी सुप्रीम कोर्टाने उठवली असून आता बैलगाडी शर्यतीला कायदेशीर मान्यता दिली. त्यामुळे बसपाचे महाराष्ट्र प्रदेश मा मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी आनंद व्यक्त केला.

बैलगाडी शर्यत किंवा शंकरपट ग्रामीण मध्ये राहणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा उत्साह, आनंद व आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघितलं जायचं.

चाळीस वर्षांपूर्वी नागपूर पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या बनवाडी या गावात तत्कालीन पोलीस पाटील नारायण तिडके यांच्या शेतात शंकरपट भरायचा. मी स्वतः शालेय जीवनात शंकरपटात नागपुरातून भावाने आणलेली संत्री विकून त्यावर्षीच्या शिक्षणाचा खर्च भागविल्या चे आठवते.

शंकरपटात ग्रामीणमध्ये जत्रेचे स्वरूप येत असते. एकेक आठवडा हे स्वरूप असते. म्हणून सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीवर उठवलेली बंदी स्वागतार्ह व अभिनंदन आहे. असे मत महाराष्ट्र प्रदेश बसपा चे माजी मीडिया प्रभारी उत्तम शेवडे यांनी व्यक्त केले.

NewsToday24x7

Next Post

वृद्ध दाम्पत्याच्या मदतीला धावला देवमाणूस -पुत्राप्रमाणे पार पाडली जबाबदारी

Thu May 18 , 2023
“जो वादा किया, वो निभाया” अनाथ माय बापाला भेटला, व्हि.एन.रेड्डीच्या रुपात देवमाणूस नागपूर :- यशस्वी उद्योजकापासून समाजकारण, समाजकारणातून मानव सेवेचे प्रण घेऊन मोदिच्या प्रेरणेने प्रभावित होऊन व्हि.एन.रेड्डी रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व्हि.एन.रेड्डी यांनी गरिब कुटुबांसाठी देवमाणसांच्या रुपात धाव घेतली “जो वादा किया वो निभाया,” स्लम एरियातील संजयनगर येथील अत्यंत गरिब व गरजू […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com