वृद्ध दाम्पत्याच्या मदतीला धावला देवमाणूस -पुत्राप्रमाणे पार पाडली जबाबदारी

“जो वादा किया, वो निभाया”

अनाथ माय बापाला भेटला, व्हि.एन.रेड्डीच्या रुपात देवमाणूस

नागपूर :- यशस्वी उद्योजकापासून समाजकारण, समाजकारणातून मानव सेवेचे प्रण घेऊन मोदिच्या प्रेरणेने प्रभावित होऊन व्हि.एन.रेड्डी रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व्हि.एन.रेड्डी यांनी गरिब कुटुबांसाठी देवमाणसांच्या रुपात धाव घेतली “जो वादा किया वो निभाया,” स्लम एरियातील संजयनगर येथील अत्यंत गरिब व गरजू तांडेकर परिवार घरात फक्त दोनच व्यक्ति, तेही वयाच्या 80 च्या उंबरठ्यावर, लकवा मारलेला गंभिर आजार, बिकट परिस्थीती, नातेवाईक कुणीही नाही, दोन वेळच्या जेवणासाठी भटकंती औषधेसाठी, जेवायला, बिस्किटे सुध्दा घ्यायला पैसे नाहीत, शेजार-पाज़ार मदतही कुठपर्यंत करणार हि बाब जशी व्हि.एन.रेड्डी रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व्हि.एन.रेड्डी यांना कळली तसेच पूर्ण टीम सह त्यांनी ताबडतोब त्या कुटुंबांच्या घरी जाऊन भेट घेतली, व त्यांच्या संपूर्ण जीवनाची मदत करू असा निर्णय घेतला. म्हणजेच त्याच्या आयुष्याच्या शेवटपर्यंतची वाटेल ती मदत देऊन या कुटुंबाला दत्तक घेतले. पण नियतीला काही वेगळेच मंजुर होते मदत देऊन एक महिनाही नाही झाला की, तांडेकर परिवारातील काकाजी यांना देवाज्ञा झाली. अशा परिस्थीतीत अंतिम संस्कार कसे करावे हा प्रश्न निर्माण झाला. आईची तब्येत अजुनच खालावली, तांडेकर काकांचा देहांत झाल्याची बातमी कळताच फाउंडेशनच्या सर्व चमुसह व्हि.एन.रेड्डी धावून आले. त्यांनी निर्णय घेऊन अंतिम संस्कारापासून तर अस्थिविसर्जन पर्यतचा संपूर्ण खर्च उचलला, त्यानंतरच्या संपूर्ण विधी उरकून दिली, व आर्ईला बांगडी चोळी केली. त्या आईचा आशिर्वाद घेतला. संपुर्ण दृश्य पाहुन तेथील नागरिकांच्या मुखातून एकच शब्द निघाला आई तुला भेटला खरा देवमाणूस !!! अशाप्रकारे या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना सहकार्य केले जाते. व्हि एन रेड्डी व त्यांची चमू मदतीला धावून जातात. गोर गरीब वस्तीतच नाही तर हि व्यक्ती आज सर्व स्तरावर वाखणन्यासारख काम करत आहे, जातीभेद न करता माणुसकीच सर्व तो परी मानत सर्वांच्या मदतीला धावून जाणारे फक्त एकमेव माणूस म्हणजे व्हि एन रेड्डी ठरला आज एका कुटृंबासाठी देणमाणूस !

NewsToday24x7

Next Post

पोलिस, आरपीएफ आणि रेल्वे कर्मचार्‍यांचे प्रयत्न

Thu May 18 , 2023
– नागपूर रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी – दिड तास गाडीला उशिर नागपूर :-संघमित्रा एक्सप्रेसच्या शौचालयाचे दार बर्‍याच वेळपासून बंद असल्याने प्रवाशांना शंका आली. रेल्वे कर्मचार्‍यांच्या मदतीने दार तोडताच एक व्यक्ती बेशुध्दावस्थेत आढळला. रेल्वे डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. ही घटना गुरूवार 18 मे रोजी सकाळी 8.50 वाजेच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर घडली. उष्माघाताने त्याचा मृत्यू झाला असावा, अशी चर्चा […]

You May Like

Latest News

The Latest News

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com