एम्स नागपूर येथे दुसरे कॅडेव्हरिक किडनी प्रत्यारोपण

नागपूर :- एम्स नागपूर येथे दुसरे कॅडेव्हरिक अवयव पुर्नप्राप्ती आणि मूत्रपिंड प्रत्यारोपण यशस्वीरित्या पार पडले. ही किडनी प्रत्यारोपण प्रकिया सरकारसाठी मैलाचा दगड आहे. कार्यकारी संचालक, प्रा.डॉ.हनुमंत राव, आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनीष श्रीगिरीवार, यांनी याबाबत माहिती दिली

महिला रुग्ण मंदा ठाकरे वय 55 वर्षे O+ रक्तगट, कुरुड, देसाईगंज गडचिरोली, महाराष्ट्र. ज्यांना 17 जुलै 2023 रोजी ब्रेन ट्यूमरच्या व्यवस्थापनासाठी एम्स नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. तिच्यावर एम्स, नागपूर येथे ब्रेन ट्यूमरसाठी शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तिला सर्जिकल आयसीयूमध्ये व्यवस्थापित करण्यात आले. मात्र तिची प्रकृती सतत खालावत गेली. दरम्यान, कुटुंबातील सदस्यांना अवयवदानाच्या शक्यतेबद्दल माहिती देण्यात आली आणि त्यांनी स्वेच्छेने यासाठी संमती दिली. एम्स नागपूरच्या डॉ. सुचेता भोवते मेश्राम आणि त्यांच्या टीमने आयसीयूमधील रुग्णाची विशेष काळजी घेतली. एम्स नागपूरचे ब्रेन स्टेम डेथ समितीचे अध्यक्ष वैद्यकीय अधीक्षक डॉ मनीष श्रीगिरीवार, डॉ. वरिध कटियार, डॉ. उदित नारंग आणि डॉ. ओम शुभम असई यांनी औपचारिकता पूर्ण केली.आणि 3 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:00 च्या सुमारास THOTA कायदानुसार रुग्णाचा मेंदू मृत घोषित केला.

एम्स नागपूरने तातडीने ZTCC ला अलर्ट केले. ZTCC नागपूर द्वारे निकषानुसार वाटप खालील प्रमाणे:

1. AIIMS नागपूरच्या पहिल्या प्रतीक्षेत असलेल्या रुग्णाला दात्याची पहिली किडनी देण्यात आली.

2. दुसरी किडनी KIMS KINGSWAY हॉस्पिटल नागपूरला देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

CBSE : HEALTH AND PHYSICAL EDUCATION अनिवार्य

Tue Aug 8 , 2023
– उन्होंने कहा कि बोर्ड ने स्कूलों को हर दिन उनके लिए स्वास्थ्य और शारीरिक शिक्षा का एक पीरियड रखने का निर्देश दिया है। नागपुर :- सरकार ने कहा है कि योग को स्वास्थ्य और शारीरिक शिक्षा के अभिन्न अंग के रूप में अनुशंसित किया गया है। लोकसभा में एक लिखित प्रश्‍न के उत्‍तर में केंद्रीय शिक्षा राज्य मंत्री अन्नपूर्णा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com