अंधश्रध्देवर प्रहार करत सत्यपाल महाराजांकडून सामाजिक जागृती

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- अंधश्रध्देवर शाब्दिक प्रहार करत विविध सामाजिक विषयावर जागृती करत सत्यपाल महाराज यांनी ज्वलंत प्रश्नावर प्रकाश टाकला.

भिलगाव येथील नवीन हनुमान मंदिर पंचकमेटी परिसरात माॅ तुळजाभवानी दुर्गा उत्सव मंडळ भिलगाव तर्फे सोमवारी (ता २६) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचे दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने अध्यक्ष शालीक वंजारी यांनी स्वागत केले.

यावेळी सत्यपाल महाराज यांनी अनेक ज्वलंत विषयाला हात घालून शाब्दिक प्रहाराचे कोडे ओढले. वाढत्या शेतकरी आत्महत्यावर चिंता व्यक्त करीत बळीराजा जगला पाहिजे यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावे. माणूस जगात आला म्हणून पुण्यवान झाला असे समजू नये तर रक्तदान व मृत्यूनंतर अवयवदान करुन पुण्यवान बना. बुवाबाजी हे थोतांड असून विशेषतः महिलांनी याच्या नादी लागू नये. तरच घरात सुखशांती लाभेल अन्यथा महिलांची सातत्याने पिळवणूक होईल असा वडीलकीचा सल्ला दिला. भ्रूणहत्येवर प्रहार करीत पोटातील व बाहेरील मुलींना वाचविण्याचे साकडे घालत स्त्री शिक्षणावर जागृती केली.कार्यक्रमाच्या आयोजनासाठी अध्यक्ष शालीक वंजारी, उपाध्यक्ष अभय जिभकाटे, सचिव प्रभाकर बावनकुळे, रवींद्र जिभकाटे, डॉ चेतन सेलोकर, हर्षल जिभकाटे, ईश्वर महाकाळकर, निर्मल जिभकाटे, अभिजित लांबट, मनोज जिभकाटे, चंद्रकांत फलके, भास्कर भनारे, शेखर लांबट, सुरेश सेलोकर, आशिष कुंभारे, गोपाल साखरकर, मोरेश्वर तांदुळकर, संदीप पाटील यांच्यासह माॅ तुळजाभवानी दुर्गा उत्सव मंडळ भिलगावच्या पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com