रेल्वेच्या धडकेत वृध्देचा मृत्यू

नागपूर :-नागपुरच्या दिशेने येणार्‍या रेल्वेच्या धडकेत एका वृध्द महिलेचा जागीच मृत्यू झाला. वेणू सावंत (70), रा. बोरखेडी, असे मृतक महिलेचे नाव आहे. ही दुर्देवी घटना बुधवार 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास बोरखेडी रेल्वे स्थानक परिसरात घडली.

वृध्द महिला सकाळी घरून निघाली. फिरायला जातो असे सांगून ती रेल्वे स्थानक परिसरात आली. पलिकडे जाण्यासाठी ती रेल्वे मार्ग ओलांडत होती. त्याच वेळी मुंबई कडून नागपुरच्या दिशेने येणार्‍या मेलच्या धडकेत वृध्द महिलेचा जीव गेला. याघटनेची नागपूर लोहमार्ग पोलिसांना सूचना मिळाली. पोलिस हवालदार संदीप धंदर आणि शिपाई शैलेश रामटेके यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठविले. घटनास्थळी मृतकाच्या कुटुंबातील सदस्यांसह परिसरातील नागरिकांची गर्दी होती. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी नोंद केली आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वैदिक सनातन हिन्दू धर्म मे हवन अनुष्ठान का वैज्ञानिक महत्व 

Wed Feb 22 , 2023
नागपूर :-पुरातन काल से वैदिक सनातन हिन्दू धर्म मे हवन अनुष्ठान का वैज्ञानिक महत्व बता दें कि हवन अनुष्ठान से पंच्चमहाभूत एवं प्राकृतिक(नैसर्गिक) देवी देवताओं को प्रसन्न किया जा सकता हैं एवं अपनी मनोकामनाएं पूर्ण की जा सकती हैं, पूजा अनुष्ठान सफल होने से सभी प्रकार की ग्रह व्याधि, अनिष्ट सूतक पातक ग्रह दोष दूर होते हैं। वैदिक हवन अनुष्ठान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com