संत ताजुद्दीन बाबा यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा

कन्हान :- संत ताजुद्दीन बाबा यांचा १६४ व्या वाढ दिवसी सत्रापुर येथुन घोडा, डिजे, ढोल ताश्या सह बगी मध्ये संत ताजुद्दीन बाबाची प्रतिमा ठेवुन नाचत, गाजत संदल मिरवणुक काढुन गांधी चौकात केक कापुन संत ताजुद्दीन बाबांचा यांचा वाढदिवस उत्साहा ने थाटात साजरा करण्यात आला.

संत ताजुद्दीन बाबा जन्म दिवसी सत्रापुर येथुन घोडा, डिजे, ढोल ताश्या सह बगी मध्ये संत ताजुद्दीन बाबाची प्रतिमा ठेवुन नाचत, गाजत मिरवणुक काढुन गांधी चौक कन्हान येथे उत्तमराव बाबा दुरूगकर, कुमार बाबा पात्रे, डँनियल शेंडे, नेवालाल पात्रे, शहजाद , दलजित पात्रे, देविदास खडसे, भुरा पात्रे, सतिष नाडे, बादल लोंढे, शक्ती पात्रे, सावन लोंढे, अर्जुन पात्रे आदीच्या प्रमुख उपस्थित केक कापुन संत ताजु द्दीन बाबांचा जय घोष करण्यात आला.

तदंतर राष्ट्रीय महामार्गाने मिरवणुक नविन पोलीस स्टेशन, बाबासाहे ब आंबेडकर चौक, लाल बहादुर शास्त्री, तारसा रोड चौकातुन परत मिरव़णुक गांधी चौक कन्हान येथे पोह चुन महाप्रसाद वितरण करून संत ताजुद्दीन बाबांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास नेवालाल पात्रे, अमर पात्रे, रविंद्र लोंढे, युवराज पात्रे, श्राजु गायकवाड, सतिश शेंडे, विनोद पात्रे, रूपा गायकवाड, सारिका पात्रे, आनिता लोंढे, पूनम पात्रे, सुनिता लोंढे उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता रामा पात्रे, मेहर इंचुरकर, सावन रोक डे, सन्नी पात्रे, अंकित बचले, कोह‌नुर हातागडे, चंदन गायकवाड, आरविंद शेंडे, महेंद्र खडसे, किशोर शेंडे, विष्णु पात्रे, रविंद्र गायकवाड, महेन्द्र शेंडे, धारा लोढे, विर गायकवाड, चंदन पात्रे, काशी शर्मा, आशिष पात्रे, सुनिल उमरकर, जितेंद्र पात्रे आदीनी परिश्रम घेतले.

ऑटो युनियन कन्हान

संत ताजुद्दीन बाबा यांचा १६४ वा वाढदिवस निमित्त्य ऑटो युनियन कन्हान द्वारे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संत ताजु द्दीन बाबा यांचा वाढ दिवसाच्या दिवशी सत्रापुर येथुन संदल शरीफ काढुन महामार्गाने जुने पोलीस स्टेशन गांधी चौक, डॉ बाबा साहेब आंबेडकर चौक, तारसा चौकातुन परत महा मार्गाने संदल चे गांधी चौक येथे समापन करण्यात आले. त्यानंतर संत ताजुद्दीन बाबा यांचा प्रतिमेला पुष्पार्पण करुन फातिया नंतर केक कापण्यात आला आणि महाप्रसाद वितरित करण्यात आले. दुसऱ्या दिवशी सत्रापुर येथील हनुमान मंदिर जवळ हबीब अजमेरी हसनबाग नागपुर यांचा कव्वा लीचे आयोजन करण्यात आले. कव्वालीचा कार्यक्रमा त भाविकांनी मोठ्या संख्येत उपस्थित राहुन आनंद घेतला. अश्या दोन दिवसीय कार्यक्रमाने संत ताजुद्दीन बाबा यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता नगरसेवक डायनल शेंडे, माहेर इंचुलकर, अर्जुन पात्रे, रामा पात्रे, सावन लोंढे, अंकुश, सावन रोकडे सह आदिंनी सहकार्य केले.

संगीत भारती मित्र परिवार कन्हान

संगीत भारती मित्र परिवार द्वारे गांधी चौक कन्हान येथे संत ताजुद्दीन बाबा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सायंकाळी संत ताजुद्दीन बाबा प्रतिमे सामोर केक कापुन गांधी चौक येथुन भव्य संदल काढण्यात आला. महामार्गाने नगर भ्रमण करुन संदल चे गांधी चौक येथे समारोप करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद वितरण करुन संत ताजुद्दीन बाबा यांचा वाढदिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. याप्रसंगी नितिन मेश्राम, गणेश भालेकर, बादल सहारे, नितेश टेंभुर्णे, प्रणित मेश्राम, उमेश यादव सह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता आयोयक संगीत भारती मित्र परिवार आणि नागरिकांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

डीपीएस कामठीने पटकावला प्रेसिडेंट कप

Tue Feb 4 , 2025
नागपूर :- क्रिकेट मॅनिया ४.० अंतर्गत आयोजित आंतरशालेय प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद दिल्ली पब्लिक स्कूल (डीपीएस) च्या कामठी शाखेने पटकावले. ३० जाने ते १ फेब्रुवारी दरम्यान झालेल्या या स्पर्धेत विविध शाळांनी सहभाग घेतला. अंतिम सामना कामठी येथील दिल्ली पब्लिक स्कूल आणि काळे आशीर्वाद स्कूल या संघांत झाला. या सामन्यात डीपीएसने आक्रमकपणे फलंदाजी करीत 10 षटकांमध्ये 5 गडी गमावत 96 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!