मुंबई शहर जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागास बाल न्याय निधी उपलब्ध

मुंबई : सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल संकिर्ण प्रकरणात देण्यात आलेल्या आदेशान्वये सर्वोच्च न्यायालयाने महिला व बाल विकास  विभागास बाल न्याय निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मुंबई शहर जिल्ह्याकरिता बाल न्याय निधी आयुक्तमहिला व बाल विकास पुणे यांनी जिल्हाधिकारी तथा अध्यक्षजिल्हाकृती दलमुंबई शहर यांच्या खात्यात हा निधी जमा केलेला आहे. या रकमेचा विनियोग कोविड 19 मुळे एक पालक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 03 ते 18 बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी (शालेय शुल्कवसतीगृह शुल्कशैक्षणिक साहित्य खरेदी या उद्देशासाठी) प्रति बालक कमाल मर्यादा रु.10000/ (अक्षरी रु. दहा हजार) इतकी वापरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

            मुंबई शहर जिल्ह्यातील कोविड 19 मुळे एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 03 ते 18 बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी निधी वितरीत करावयाचा असल्याने पात्र लाभार्थी यांनी मुंबई शहर जिल्ह्यातील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहरबी.डी.डी. चाळ क्र.117पहिला मजलावरळी- 400018 यांचे कडून अर्जाचा नमुना घेवून आवश्यक कागदपत्रे मुळ अर्जासह प्रस्ताव जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहर कार्यालयास सादर करावा. प्राप्त अर्जाची छाननी झाल्यानंतर ते जिल्हा कृती दल यांना सादर करण्यात येईल. आर्थिक सहाय्य मंजुरीबाबतचा जिल्हा कृतीदल यांचा निर्णय अंतिम असेल त्याप्रमाणे निधी वितरण करण्यात येईलयाची नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालयमुंबई शहरदूरध्वनी क्रमांक २४९२२४८४ यांच्याकडे संपर्क साधावा.

            अर्जासोबत अर्थसहाय्य मिळण्याकरिता पुढील कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. अर्जबालकांचे शाळेचे बोनाफाईडआई वडील कोविड पॉझिटिव्ह असल्याबाबतचा पुराव्याची झेरॉक्सआई वडील मृत्यु दाखलाबालक अथवा बालक पालकसंयुक्त राष्ट्रीयकृत बँकेत खाते असलेल्या बँकेचे पास बुकरद्द केलेल्या धनादेशाची मुळ प्रतबालकाचे आधारकार्ड इ. कागदपत्रे स्वयं साक्षांकीत करुन अर्जासोबत जोडावीअसे  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारीमुंबई शहर श्रीमती शोभा शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चीचाळा येथे भूमिगत नालीचे पंचायत समिती सदस्य नरेंद्र बंधाटे यांचा हस्ते उद्घाटन   

Thu Mar 31 , 2022
  रामटेक –ग्रामपंचायत चिचाळा- हमलापुरी अंतर्गत चिचाळा येथील वॉर्ड न ४येथे पंचायत समितीच्या १५ व्यां वित्त आयोगाच्या विशेष निधीमधून भूमिगत नालीचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य  नरेंद्र बंधाटे   यांचा हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच सौ.कविता बसिने,उपसरपंच सुनील गयगये, बालचद बादुले,राजेश जयस्वाल ,चरण यादव,ओमेन मोहारे,गौरीशंकर माहुले,प्रकाश मोहरे, ग्यानीलाल दमाहे, हरीचंद बंधाटे आणि चीचाळा येथील ग्रामवासी उपस्थित होते.पंचायत समिती सदस्य  नरेंद्र बंधाटे  यांचा  […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com