प्रकाश जाधव यांचा जन्मदिवस नागपुर जिल्हयात अत्यंत साधेपणाने साजरा. 

सर्वसामान्याच्या न्याय हक्का करिता नागपुर जिल्हयाची प्रमुख जिम्मेदारी पक्ष श्रेष्ठीने प्रकाश जाधव यांना घ्यावी. असे शुभचिंतन दिले.

 

कन्हान : – रामटेक लोकसभा शिवसेना माजी खास दार  प्रकाश  जाधव यांचा जन्मदिवस नागपुर  शहर व जिल्हा ग्रामिण च्या सर्व तालुक्यातील हित चिंतक कार्यकर्त्यानी अत्यंत साधेपणाने साजरा करून त्यांचे राहते घर कन्हान येथे दिवसभर शुभेच्छा वर्षाव करित चांगलीच गर्दी करून सर्वसामान्याच्या न्याय हक्का करिता नागपुर जिल्हयाची प्रमुख जिम्मेदारी पक्ष श्रेष्ठीने प्रकाश  जाधव यांना घ्यावी. असे शुभचिंतन नागपुर जिल्हा शहर व ग्रामिण पदाधिकारी, जनप्रतिनिधी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी दिले.

          बाळासाहेब ठाकरे यांच्या उतुंग प्रेरणेतुन शिवसेना कन्हान प्रमुख पदापासुन धुरा खांद्यावर घेऊ न रामटेक विधानसभा, नागपुर जिल्हा ग्रामिण, शहर प्रमुख आणि विविध पदावर कार्य करून सर्व सामान्या च्या समस्या सोडवुन जनसामान्याच्या सेवेकरिता दिव सरात्र पद असो वा नसो तरी नियमित झटुन शिवसेने चा पाया जिल्हयात बुलंद करून झुंजार नेतुत्वाने शिव सेना व कन्हानचे नाव विदर्भ,

महाराष्ट्रासह दिल्ली संस देत पोहचविणारे तसेच रामटेक व विदर्भाची मुलुख मैदानी तोफ रामटेक लोकसभा शिवसेना माजी खास दार व विवेकानंद ट्रस्ट प्रणित ग्रामोन्नती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष  प्रकाश  जाधव यांचा जन्मदिवस मंगळवार (दि.५) एप्रिल २०२२ ला नागपुर शहर व  जिल्हयातील सर्व तालुक्यात पदाधिकारी, हितचिंतक कार्यकर्त्यानी अत्यंत साधेपणाने साजरा केला.

कन्हान त्यांचे राहते घरी सकाळी पासुन पारशिवनी, रामटेक, मौदा, कुही, उमरेड, भिवापुर, हिंगणा, कळमेश्वर, काटोल, नरखेड, सावनेर, कामठी, नागपुर ग्रामिण व नागपुर शहर जनप्रतिनिधी, पदाधिकारी, हितचिंतक कार्यक र्त्यानी जन्मदिवसाच्या शुभेच्छा वर्षाव करून चांगलीच गर्दी केली होती.

       नागपुर जिल्हयात पुनश्च शिवसेना प्रखरतेने बुलंद करण्यास व सर्वसामान्याच्या वाढत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रकाश जाधव यांनी नागपुर शहर आणि विशेषत: नागपुर जिल्हा ग्रामिणची प्रमुख जिम्मेदारी शिवसेना पक्ष श्रेष्टी कडुन घेऊन शिवसेनेचा धनुष्यबाण नागपुर जिल्हयासह महाराष्ट्र आणि दिल्ली च्या तखत्यावर बुलंद करून सर्वसामान्य जनाना न्याय द्यावा. हिंदुहुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे व शिव सेनेचा जयघोष करित कार्यकर्ते, हितचिंतकांनी शुभ चिंतन केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

पंचायती राज समितीचा आजपासून नागपूर दौरा

Thu Apr 7 , 2022
नागपूर  : पंचायती राज समिती नागपूर जिल्हा परिषदेला कामकाजाचा आढावा घेणार असून आज  7 एप्रिलपासून या समितीचा दौरा सुरू होणार आहे. आपल्या तीन दिवसीय कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेच्या कामकाजाचे परिक्षण ही समिती करणार आहे.             जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या माहितीनुसार पंचायती राज समिती 7 एप्रिलला सकाळी 10.30 ते 11 या काळात नागपूर जिल्ह्यातील विधानसभा व विधानपरिषद सदस्यासोबत तसेच 11 ते 11.30 या काळात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com