महा मेट्रो व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांच्या हस्ते कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पुरस्कार प्रदान

नागपूर :- दर वर्षी साजरा होणारा कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पुरस्कार प्रदान सोहळा काल (१४ ऑक्टोबर) रोजी मुंबई येथे संपन्न झाला. मुंबई च्या आयटीसी ग्रँड सेंट्रल येथे हा सोहळा संपन्न झाला. आठव्या इंडियन कन्स्ट्रक्शन समारोहाचा हा भाग होता आणि फर्स्ट कन्स्ट्रक्शन कॉउंसिल च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बांधकाम, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी क्षेत्रात महत्वाचे योगदान करणाऱ्या कंपन्यांना हा पुरस्कार दिला जातो.

महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित हे या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांच्या हस्ते पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. डॉ दीक्षित `कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इअर’ – या प्रतिष्ठित पुरस्काराचे २०२० मध्ये मानकरी होते. नागपूर आणि पुणे शहरात मेट्रो सेवा सुरु करण्याबद्दल आणि दळण वळणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल त्यांना हा पुरस्कार २०२० मध्ये देण्यात आला होता.

या प्रसंगी बोलताना, डॉ. दीक्षित यांनी सांगितले कि महा मेट्रोने नागपूर आणि पुणे येथे प्रकल्प राबवताना तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला आणि आता सर्वत्र याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी कौशल्याचा वापर करत महा मेट्रोने फक्त वेळेची बचत केली नाही तर गुणवत्ता कायम राखत, प्रकल्पावर होणारा खर्च देखील कमी केला आहे.

डॉ. दीक्षित यांनी पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन केले. कन्स्ट्रक्शन वर्ल्डमुळे एक चांगले व्यासपीठ सर्वांना प्राप्त झाले असून आणि आज इथे अनेक कंपन्या आहेत ज्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. पायाभूत सुविधा क्षेत्राशी संबंधी कामाबद्दल त्यांनी या सोहळ्याचे आयोजक कन्स्ट्रक्शन वर्ल्ड आणि फर्स्ट कन्स्ट्रक्शन कॉउंसिलचे देखील कौतुक केले आणि भविष्याच्या वाटचाली करता त्यांना शुभेच्छा दिल्यात.

या वर्षीचे सार्वजनिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इअर अवनीश अवस्थी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री  योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार यांना प्रदान करण्यात आले. आपल्या भाषणात अवस्थित यांनी उत्तर प्रदेश मध्ये दळण वळण आणि पायाभूत सुविधांसंबंधी होत असलेल्या प्रगतीची माहिती दिली. मेट्रो, रस्ते, महामार्ग सारख्या आयुधांचा प्रगतीमध्ये मोठा वाटा असतो, असे देखील ते म्हणाले.

आपल्या स्वागतपर भाषणात तन्वीर पडोडे, बिझनेस हेड-डिजिटल, एएसएपीपी समूह, यांनी या पुरस्कार सोहळ्यासंबंधीची आणि यात सहभागी झालेल्या कंपन्यांची माहिती दिली. प्रताप पडोडे, संस्थापक आणि अध्यक्ष, फर्स्ट कन्स्ट्रक्शन कॉउंसिल, यांनी म्हटले कि पायाभूत सोइ सुविधा प्रदान करणाऱ्या या उद्योगाची पाठराखण करणे अतिशय आवश्यक आहे. तंत्रज्ञानाच्या माध्यमाने या क्षेत्राची आणि पर्यायाने देशाची प्रगती होईल हि अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली.

खाजगी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कन्स्ट्रक्शन वर्ल्ड पर्सन ऑफ द इअर पुरस्कार एस व्ही देसाई, निदेशक, एल अँड टी आणि इंजिनियर ऑफ द इअर पुरस्कार लेफ्टनंट जनरल हरपाल सिंह, इंजिनियर इन चीफ, भारतीय सेना यांना मिळाला. या शिवाय विविध श्रेणी अंतर्गत ५० पेक्षा जास्त पुरस्कार देखील या सोहळ्यात प्रदान करण्यात आले.

NewsToday24x7

Next Post

दान उत्सव को भारी प्रतिसाद, नागरिकोने काफी तादाद मे कपडे,पुस्तके की दान

Sun Oct 16 , 2022
नागपूर :- मेट्रो स्टेशनों पर महा मेट्रो द्वारा यात्री सेवा के अलावा विविध सामाजिक कार्य किए जाते है । इन गतिविधियों के माध्यम से, महा मेट्रो को नागरिकों की ओर से अच्छा सहयोग मिलता है। इसी तारतम्य मे महा मेट्रो ने 2 अक्टूबर से 9 अक्टूबर तक चैरिटी फेस्टिवल का आयोजन मेट्रो स्टेशनो पर किया था जिसे नागरिकोने उत्स्फूर्त प्रतिसाद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com