संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- शेतकऱ्यांच्या हिताचे असलेले पीएमकीसान योजना पूर्वी महसूल विभागाच्या वतीने केली जात होतो मात्र काही कालावधी नंतर महसूल विभागाने या योजनेच्या कामावर बहिष्कार टाकल्याने ही योजना कृषी विभागाकडे वर्ग करण्यात आली. मात्र आता कृषी विभागाने या पी एम किसान योजनेच्या कामावर बहिष्कार टाकल्याने पीएम किसान योजनेचे कामे करणार कोण? तसेच या योजनेसंदर्भातील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रश्न कोण सोडवीणार?असा प्रश्न येथील शेतकरी वर्ग करीत आहे.
पीएम किसान योजनेचे कामठी तालुक्यात 9 हजार 832 लाभार्थी आहेत.या योजनेचा अतिरिक्त भार हा कृषी सहाय्यक, पर्यवेक्षक कडे असल्याने या योजनेचा अतिरिक्त भार कृषी विभागावर पडत आहे,तर कधी कधी नागरिकांच्या रोषाला ही बळी पडावे लागत असल्याने कृषी सहाय्यक व पर्यवेक्षकांनी पी एम किसान योजनेच्या या कामावर बहिष्कार टाकला आहे.या बहिष्कारामुळे पी एम किसान योजनेचे काम थांबले असून या योजनेतील जुन्या लाभार्थ्यांना या योजनेसंदर्भात असलेल्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी कामठी तालुका कृषी कार्यालयात हेलपाटे मारावे लागत आहे.