मला विचारून लफडा केला का?खासदार नवनीत राणा Audio clip व्हायरल !

नागपूर : अमरावतीच्या खासदार नवनीत रवी राणा या नेहमीच कोणत्या  ना कोणत्या  कारणाने चर्चेत राहतात. सत्ताधारी महाविकास आघाडीवर निशाणा साधणे असो किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका असो. राणा यांची नेहमीच चर्चा होते. आताही त्या Audio clip मुळे  चर्चेत आल्या आहेत. मात्र, त्यांनी केलेल्या आक्षेपार्ह Audio clip  संभाषणामुळे त्यांना राज्य महिला आयोगाने नोटीस  बजावून खुलासा मागितला आहे.

युवा स्वाभिमान पार्टीच्या पदाधिकाऱ्याने आपली फसवणूक केल्याची तक्रार महिलेने खासदार नवनीत रवी राणा यांच्याकडे केली होती. त्यासाठी त्यांनी खासदार राणा यांना फोन करून माहिती दिली व पदाधिकाऱ्याला समज द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र, नवनीत राणा यांनी महिलेची उलट तपासणी करीत ‘तुम्ही मला विचारून लफडा केला का’ असा उलट प्रश्न विचारला.खासदार नवनीत रवी राणा यांनी कैफियत ऐकून घेतली नाही म्हणून महिलेने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी तक्रारीची दखल घेत खासदार राणा यांना नोटीस बजावत उत्तर मागितले आहे. आता हे प्रकरण कोणे वळण घेणार, हे नवनीत राणांच्या उत्तरानंतर कळणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

“ते” गावगुंड तर “हे” गाढव! भाजयुमोचा पलटवार.

Mon Jan 24 , 2022
नागपुर – आज भारतीय जनता युवा मोर्चा, नागपुर महानगरातर्फे बेताल वक्तव्य करणार्या नाना पटोलेंची छापरुनगर चौक येथुन धिंड काढण्यात आली. जे लोकं बेताल बड-बड करतात त्यांची बुद्धी ही गाढव बुद्धी असते आणि ज्याची बुद्धी गाढव बुद्धी असते त्यांचे नाव नाना पटोले असते. आमच्या शहरातील सर्व गाढवांचे नाव नाना पटोले आहे आहे असा पलटवार या वेळेला भाजयुमो प्रदेश महामंत्री शिवानी दाणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com