अमरदिप बडगे गोंदिया / आमगाव – गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक पोलिस निरिक्षक व एका खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आमगाव येथिल तक्रारदार हा आधी जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यामुळे त्याच्या विरोधा आमगाव पोलिसात तक्रार आली असुन त्या वर गुन्हा दाखल होणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगीतले त्यासाठी तक्रारदार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस पाच किमी अंतरावर खंडाळा शिवार एन एच ४४ रोडवर एका टिप्पर ट्रक चालकाने दुचाकी वाहनाला समोरून जोर दार धडक मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकी वाहन चालक व त्यांची पत्नी गंभीर जख्मी झाल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी यांचा तक्रारी वरून टिप्पर ट्रक चालका विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला. प्राप्त […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 12 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी मार्गावरील वेलकम बिअर बारच्या शेजारी असलेल्या गुडीस डिलाईज नामक कुलूपबंद दुकानाचे शटर वाकवून दुकानात अवैधरीत्या प्रवेश करून दुकानाच्या तिजोरीत ठेवलेले नगदी 35 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली असून यासंदर्भात फिर्यादी विकास गोयल वय 44 वर्षे रा ऑटोमोटिव्ह चौक नागपूर […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 12 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील हैदरी चौकातील कुलूपबंद असलेल्या क्लब फॉक्स रेडिमेड दुकानात अज्ञात चार चोरट्याने दुकाणाच्या छतावरील दाराची कोंडी तोडून दुकानात अवैधरित्या प्रवेश करून दुकानातील रेडिमेड कपडे व इतर साहित्य असा एकूण 56 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना काल रात्री दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी हिमांशू दिपाणी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 12:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या झेंडा चौक येरखेडा येथील कुंडकार कुटुंब काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने घरी कुणी नसल्याची संधी साधून दाराला लावलेला कुलूप तोडुन अवैधरित्या प्रवेश करुन घरातील गोदरेज आलमारीत सुरक्षित ठेवलेले नगदी 25 हजार रुपये व सोने चांदीचे दागिने अंदाजे किमती 19 हजार रुपये […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान पोलीस व वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी, सुरक्षा रक्षकांची कारवाई. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उतरेस ०४ किमी अंतरावर टेकाडी शेत शिवारात वेकोलि कामठी उपक्षे त्र अंतर्गत खुली खदान चा कोळसा चोरून तीन आरो पींने अवैधरित्या टालवर साठवनुक केल्याचे कन्हान पोलीसाना मिळुन आल्याने वेकोलि सुरक्षा अधिका-या स बोलावुन १४ टन कोळसा किंमत ५६ हजार […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 11 :- नुपूर शर्मा व नवीन जिंदल यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे मुस्लिम समाजबांधवांच्या भावना दुखवल्या आहेत . तेव्हा भाजप च्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा व नवीन कुमार जिंदल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी या मागणीसाठी एमआयएम चे नागपूर जिल्हा ग्रामीण अध्यक्ष शकिबुर रहमान यांच्या नेतृत्वात नवीन कामठी […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी -अटक चोरट्याकडून 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 11:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आवंढी शिवारातून शेतातून जाणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरील तारांची चोरी करणाऱ्या अट्टल तीन चोरट्यास नवीन कामठी पोलिसांनी अटक करून 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गतरात्री सात वाजेच्या सुमारास केली. […]

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस चार किमी अंतरावर बोरडा टोल नाक्या जवळ तीन आरोपीतांनी कमल सकतेल ला बाॅटल, टायर च्या पान्याने व हाथ बुक्याने मारहाण करून जख्मी केल्याने कन्हान पोली सांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध करित आहे.           प्राप्त माहिती नुसार फिर्यादी कमल […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  मुलींवर अतिप्रसंग व विनयभंग करणारा आरोपी गोपाल गोंडाणे अटक. कन्हान : – कराटे प्रशिक्षक असलेल्या आरोपी नराध माने त्याच्याच क्लासमध्ये येत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीशी अतिप्रसंग व विनयभंग केल्याने पीडीत एका मुलीच्या पालकांनी कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी वरिष्ठाच्या मार्गदर्श नात आरोपी गोपाल गोंडाणे विरूध्द विविध कलमा न्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केल्याने […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9 :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेरी गावातील नागपूर जबलपूर महामार्गावरील एच पी पेट्रोलपंप समोरच्या 100 मीटर अंतरावरील सर्विस रोड वर चार आरोपीनी संगनमताने ट्रक चालक सुरज पटेल वय 28 वर्षे रा उत्तरप्रदेश ला ट्रक मधून खाली बोलावून या ट्रक चालकाच्या ढुंगणावर चाकूने मारहाण करून गंभीर जख्मि करीत त्यांच्याकडील 16 हजार […]

– एकुण 73 लाख 49 हजार सडक्या व भेसळयुक्त सुपारीचा तर 2 लाख 65 हजार किमतीचा मुदेमाल जप्त  नागपूर : संशयित सडक्या, भेसळयुक्त सुपारीचा 73 लाख 49 हजार 499 रुपये किंमतीचा साठा तसेच गुटखा, पानमसाला व सुगंधीत तंबाखुचा 2 लाख 65 हजार 420 रुपये किंमतीचा साठा अन्न व औषध प्रशासन विभागाने विविध माध्यमामार्फत एप्रिल व मे महिन्यात अनेक ठिकाणी धाडी […]

नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी आंधळगाव पोलिसांना आव्हान मोहाडी : तालुक्यातील सालई खुर्द येथील इंदूताई मेमोरियल हायस्कूल शाळेतील पंन्नास हजार रुपये किमतीच्या एलईडी टिव्ही व संगणक चोरट्याने पळविल्याची घटना बुधवार दि.८ जून २०२२ रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी आंधळगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शाळेत चोरी झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती आंधळगाव पोलिसांना मिळताच पोलिस बिट अंमलदार […]

नागपूर / अरोली –  पोलिस स्टेशन अरोली येथे अवैधरीत्या देशी दारूची विक्री करणाऱ्या आरोपीतांविरूद्ध दोन केसेस करण्यात आले आहे. प्रथम प्रकरणात पोलिस स्टेशन अरोली येथील स्टाफला गुप्त माहिती मिळाली की, अरोली येथे गुजरी चौकात राजकुमार वैद्य नावाचा ईसम दारु विकत आहे. अशा मिळालेल्या माहीती प्रमाने दिनांक 06/06/2022 चे 17/30 वा. ते 18.30 वा. सुमारास अरोली टाउन येथे रेड केली असता […]

नरखेड –  अवैध दारू विक्री संबंधाने पो स्टे नरखेड येथे विशेष मोहिम राबविण्यात आली होती. सदर मोहिमेदरम्यान पोलीस निरीक्षक  जयपालसिंह गिरासे यांचे सह पोलीस नाईक स्वप्नील बोंडे, हे पोस्टे परिसरात पेट्रोलींग करीत असता  गुप्त बातमीदार मार्फत सावरगाव येथुन एक गुलाबी रंगाचे शर्ट घातलेला ईसम मोटर सायकलचे डिक्कीत देशी दारू बाळगुन सावरगाव ते काटोल रोडने गोंडी दिग्रसकडे अवैधरित्या देशी दारू घेवुन […]

 वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांची कारवाई.    कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस तीन किमी अंतरावर इंदर खुली खदान चा कोळसा चोरून चार आरोपींने वराडा शिवाराकडे भाटीया कोलवाशरी मागे अवैधरित्या टाल वर १४ टन ५५० किलो किंमत ४४,१२० रूपयाचा कोळसा ढिगारा मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी वेकोलि सुरक्षा अधिकारी च्या तक्रारीने चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून […]

  आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.    कन्हान : –  पोलीस स्टेशन हद्दीतील खंडाळा शिवार ओवर ब्रिजच्या खाली कराटे शिक्षकाने शिक्षक पेक्षा ला मलीन करीत अल्पवयीन अकरा वर्षाच्या विद्यार्थी नी वर प्रशिक्षण देण्याचा नावावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करित पुढील तपास सुरू केला आहे.     […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी महामार्गावर लॉज व्यवसाय जोमात, शासना च्या दुर्लक्षतेने लॉज चे दुषपरिणाम वाढु लागले. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान – मनसर रोड वरील एका लाॅज मध्ये एका आरोपीने पीडित अल्पवयीन मुली सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करून जबरी संभोग केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्या दी च्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करित आरोपीस अटक करून पुढील तपास […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 05:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा रहिवासी व तत्कालीन डीसीपी निलोत्पल यांच्या 28 डिसेंबर 2020 च्या आदेशानव्ये नागपूर जिल्ह्यातून बाहेर 2 वर्षासाठी हद्दपार असलेला आरोपी वारीसपुऱ्याच्या नाल्याजवळ दहशत माजवीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून या हद्दपार आरोपीस अटक करून आरोपी विरुद्ध भादवी कलम 142,अनव्ये गुन्हा दाखल करण्यात […]

नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी प्रेम प्रकरणातून घडली हत्या;अज्ञात मारेकरी अद्याप फरार मोहाडी :- प्रेमप्रकरणातून युवकाची निर्गुण हत्या झाल्याची घटना आज दिनांक 3 मे सायंकाळी 7 दरम्यान देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसाद समोर घडली. सचिन गजानन मस्के वय 34 वर्ष राहणार नेहरूनगर तुमसर असे मृतकाचे नाव असून अद्याप आरोपी फरार असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये काय झाल्याची समजते. सविस्तर वृत्त असे […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com