अवैद्य टालवर धाड मारून १४ टन ५८ हजाचा चोरी कोळसा जप्त, ४ आरोपीवर गुन्हा दाखल

 वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी व सुरक्षा रक्षकांची कारवाई. 
 
कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पश्चिमेस तीन किमी अंतरावर इंदर खुली खदान चा कोळसा चोरून चार आरोपींने वराडा शिवाराकडे भाटीया कोलवाशरी मागे अवैधरित्या टाल वर १४ टन ५५० किलो किंमत ४४,१२० रूपयाचा कोळसा ढिगारा मिळुन आल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी वेकोलि सुरक्षा अधिकारी च्या तक्रारीने चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करित आरोपीचा शोध घेत आहे.
       प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.३) जुन ला रात्री १० वाजता दरम्यान वेकोलि कामठी उपक्षेत्र सुरक्षा अधिकारी रविकांत रामदास कंडे हे आपल्या सुरक्षा रक्षकासह पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारां नी माहिती दिली की, आरोपीतांनी संगणमत करुन वराडा शिवाराकडे भाटीया कोलवाशरी मागे अवैद्य टाल सुरू करून वेकोलिचा चोरी केलेला कोळसा साठवुन ठेवत आहे.
                     अश्या माहितीने सुरक्षा अधिकारी रविकांत कंडे हे आपल्या कर्मचा-या सोबत घटनास्थ ळी धाड मारली असता ४ आरोपीने चोरीचा कोळसा झाडी झुडपात ठेवलेला साठा मिळुन आल्याने जप्त करून ट्रक मध्ये भरून वेकोलिच्या वजन काटयावर त्याचे १४ टन ५५० किलो दगडी कोळसा किंमत ५८,२४० रूपयाचा मुद्देमाल कोळसा डेपो मध्ये जमा करून कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी सुरक्षा अधि कारी रविकांत कंडे यांच्या तक्रारी वरून कन्हान पोली सानी आरोपी १) उमेश पानतावणे राह कांद्री २)मिथुन नाडार राह. देवलापार ३) विक्की यादव राह. खदान ४) फारुख अब्दुला शेख कांद्री यांंचे विरुद्ध कलम ३७९, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोस्टे चे पोउपनि महादेव सुरजुसेे हे पुढील तपास करीत आरोपी चा शोध धेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पार पडला भव्य महिला महारोजगार मेळावा

Wed Jun 8 , 2022
गडचिरोली – गडचिरोली जिल्हा हा अतिदर्गम नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील व उद्योगविरहीत जिल्हा असून अजूनही येथील आदिवासी बांधव पारंपारीक शेती व्यवसाय करीत आहेत. शेती व्यवसायाव्यतीरिक्त कुठल्याही उद्योगाचे कौशल्य त्यांच्या हाताला, नाही यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. ही बाब लक्षात घेवून दुर्गम भागातील आदिवासी बरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, व त्यांचे जीवनमान उंचवावे या उद्देशाने गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com