संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 05:-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा रहिवासी व तत्कालीन डीसीपी निलोत्पल यांच्या 28 डिसेंबर 2020 च्या आदेशानव्ये नागपूर जिल्ह्यातून बाहेर 2 वर्षासाठी हद्दपार असलेला आरोपी वारीसपुऱ्याच्या नाल्याजवळ दहशत माजवीत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसानी त्वरित घटनास्थळ गाठून या हद्दपार आरोपीस अटक करून आरोपी विरुद्ध भादवी कलम 142,अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचे नाव मो शाहिद मो एजाज अन्सारी वय 36 वर्षे रा वारीसपुरा कामठी असे आहे.
ही यशस्वी कार्यवाही वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्या मार्गदर्शनार्थ डी बी स्कॉडचे संजय गीते,महेश कठाने ,श्रीकांत भिष्णुरकर, अंकुश गजभिये आदींनी केली.