संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-अटक चोरट्याकडून 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त कामठी ता प्र 11:- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आवंढी शिवारातून शेतातून जाणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या विद्युत पुरवठा करणाऱ्या खांबावरील तारांची चोरी करणाऱ्या अट्टल तीन चोरट्यास नवीन कामठी पोलिसांनी अटक करून 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई गतरात्री सात वाजेच्या सुमारास केली. अटक आरोपीमध्ये विजय उर्फ टायसन डोंगरे वय 50 वर्षे रा.कुंभारे कॉलोनी कामठी, अब्दुल रजजाक अब्दुल अजीज वय 27 वर्षे व शेख हारून शेख इकबाल वय 31 वर्षे दोन्ही राहणार बाबा अब्दुल्लाहशाह दरगाह कामठी चा समावेश आहे. नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील गुंमथाळा विद्युत वितरण कंपनी अंतर्गत आवंढी शिवारातील शेतात कृषी पंपाची वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत खांबावरील ऍल्युमिनियम तार अट्टल चोरटे विजय उर्फ टायसन किसन डोंगरे वय 50 राहणार कुंभारे कॉलोनी नवीन कामठी ,अब्दुल रज्जाक अब्दुल अजीज वय 27, शेख हारून शेख इकबाल वय 31 दोघेही राहणार अब्दुल्ला बाबा दर्गा रेल्वे स्टेशन समोरील यांनी तीन महिन्यापूर्वी विद्युत खांबावरील अमोनियम तार ची चोरी करून आवंढी शिवारात झाडाझुडपात लपवून ठेवून रोज गुरुवारला सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ऑटो क्रमांक 31 सि क्यु 832 मध्ये भरून कामठीच्या दिशेने येत असताना नवीन कामठी पोलिस ठाण्यातील डीबी पथकाने अजनी रेल्वे फटका समोरील परिसरात थांबून चौकशी केली असता ऑटोमध्ये विद्युत चोरीचे अमोनियम तार दिसून आले आरोपींना अटक करून नवीन पोलीस ठाण्यात आणून त्यांना विचारपूस केली असता त्यांनी आवंढी शिवारातून विद्युत वितरण कंपनीचे खांबा वरून ऍल्युमिनियम तार चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी विद्युत वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता केशव पुंडलीक घरत वय 43 वर्षे यांच्या तक्रारीवरून भारतीय विद्युत वितरण कंपनी कायदा 136 चे कलम,व सहकलम भादवी 179, 34 नुसार गुन्हा दाखल करून तिनही अट्टल चोरट्यास अटक करून त्यांचे जवळून दहा हजार रुपयाचे ऍल्युमिनियम तार व ऑटो ची किंमत 1 लाख पन्नास हजार एकूण 1 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला .वरील तीनही अट्टल चोरट्यांना कामठी येथील प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 13 जून पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे तीनही अटल चोरट्यांची 13 जूनपर्यंत पोलिस कोठडी दिल्यामुळे त्यांच्यापासून अजून काही चोरीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याचे ठाणेदार संतोष वैरागडे यांनी सांगितले आहे .
ही यशस्वी कारवाई ठाणेदार संतोष वैरागडे यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक श्याम वारंगे ,डीबी पथकाचे संदीप सगने ,सुरेंद्र शुक्ला, कमल कनोजिया, अनिकेत सांगळे यांच्या पथकाने पार पाडली.