“तुमसर शहरात युवकाची निर्गुण हत्या”

नितीन लिल्हारे, विशेष प्रतिनिधी


प्रेम प्रकरणातून घडली हत्या;अज्ञात मारेकरी अद्याप फरार

मोहाडी :- प्रेमप्रकरणातून युवकाची निर्गुण हत्या झाल्याची घटना आज दिनांक 3 मे सायंकाळी 7 दरम्यान देव्हाडी मार्गावरील हॉटेल प्रसाद समोर घडली. सचिन गजानन मस्के वय 34 वर्ष राहणार नेहरूनगर तुमसर असे मृतकाचे नाव असून अद्याप आरोपी फरार असून ही घटना सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये काय झाल्याची समजते.
सविस्तर वृत्त असे की शहरात आज प्रेम प्रकरणातून एका युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली माहितीनुसार मृतक सचिन सोबत त्याच्या दुचाकी MH 36 N 9557 काही अज्ञात बसून देवाडी मार्गावरील हॉटेल प्रसाद समोर थांबले. त्यानंतर आपसामध्ये काही वाद विवाद झाला आणि काही अज्ञात युवकांनी धारदार तलवारीने सचिनच्या मानेवर सपासप वार केले. आणि त्यातच सचिनच्या जागेवरच मृत्यू झाला मारेकरी घटनास्थळावरून पळ काढून निघाले. मात्र हॉटेल प्रसादला लागलेली सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना कैद झाल्याची माहिती झाली. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देऊन घटनास्थळी पोलीस उपविभागीय अधिकारी बिसेन आणि पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर दाखल झाले माहितीनुसार ही घटना एका प्रेमप्रकरणातून घडल्याचे कळते वृत्त लिहीपर्यंत अद्याप मारेकऱ्यांना अटक करण्यात आलेली नाही पुढील तपास पोलीस करीत आहेत

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com