कन्हान-मनसर महामार्गावरील लाॅज मध्ये अल्प वयीन मुलीशी जबरी संभोग, आरोपी अटक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

महामार्गावर लॉज व्यवसाय जोमात, शासना च्या दुर्लक्षतेने लॉज चे दुषपरिणाम वाढु लागले.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कन्हान – मनसर रोड वरील एका लाॅज मध्ये एका आरोपीने पीडित अल्पवयीन मुली सोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध करून जबरी संभोग केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्या दी च्या तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करित आरोपीस अटक करून पुढील तपास करित आहे. महामार्गावर लॉज व्यवसाय जोमात चालु असुन सुध्दा शासन, प्रशासना चे दुर्लक्षतेने या लॉज चे दुषपरिणाम वाढु लागले हे सदर घटनेतुन सामोर येत आहे.
प्राप्त माहिती नुसार शुक्रवार (दि.६) मे ते शनिवार (दि.७) मे चे दुपार दरम्यान आरोपी अनिल मनघटे वय ३० वर्ष राह. बोरडा (गणेशी) ह्याने पिडित अल्पवयीन मुलगी वय १७ वर्ष हिचा सोबत प्रेमसंबंध प्रस्थापित करून तिला लग्नाचे अमिष दाखवुन नागपु र जबलपुर राष्ट्रीय चारपदरी महामार्ग क्र ४४ कन्हान ते मनसर रोड वरील एका लाॅज मध्ये जबरदस्तीने शारीरि क संबंध करून जबरी संभोग केला. सदर प्रकरणात कन्हान पोलीस स्टेशनला फिर्यादी पिडीता चे आई वडील यांच्या तक्रारीवरून आरोपी अनिल मनघटे राह . बोरडा (गणेशी) यांचे विरुद्ध कलम ३७६, ३७६ (२) (आय), ३७६ (२) (एन) भादंवि कलम ४, ६ बालकांचे लैगिक अपराधापासुन बालकांचे सरंक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपी अनिल मनगटे यास अटक करण्यात आली असुन पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मुख्तार बागवा न व कन्हान पोलीस निरिक्षक विलाश काळे यांचे मार्गदर्शनात खापरखेड़ा पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी मल्कुवार हया पुढील तपास करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com