संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 12 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खैरी मार्गावरील वेलकम बिअर बारच्या शेजारी असलेल्या गुडीस डिलाईज नामक कुलूपबंद दुकानाचे शटर वाकवून दुकानात अवैधरीत्या प्रवेश करून दुकानाच्या तिजोरीत ठेवलेले नगदी 35 हजार रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना नुकतीच घडली असून यासंदर्भात फिर्यादी विकास गोयल वय 44 वर्षे रा ऑटोमोटिव्ह चौक नागपूर ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.