संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 9 :-स्थानिक नवीन कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या नेरी गावातील नागपूर जबलपूर महामार्गावरील एच पी पेट्रोलपंप समोरच्या 100 मीटर अंतरावरील सर्विस रोड वर चार आरोपीनी संगनमताने ट्रक चालक सुरज पटेल वय 28 वर्षे रा उत्तरप्रदेश ला ट्रक मधून खाली बोलावून या ट्रक चालकाच्या ढुंगणावर चाकूने मारहाण करून गंभीर जख्मि करीत त्यांच्याकडील 16 हजार 500 रुपये हिसकावून पसार झाल्याची घटना काल दुपारी साडे बारा दरम्यान दिवसाढवळ्या घडली असून या घटनेतील आरोपींचा शोध लावून चारही आरोपीना अटक करण्यात नवीन कामठी पोलिसांना यशप्राप्त झाले .अटक या चार आरोपीमध्ये शुभम राऊत वय 20 वर्षे रा कॅलरी नं 3, कन्हान, राजेश उर्फ लाला यादव वय 27 वर्षे रा शिवनगर कान्द्री कन्हान, अजय भारती वय 30 वर्षे रा कॉलरि नं 3, कन्हान, राजेश सहानी वय 28 वर्षे रा शिवनगर कन्हान असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर जख्मि ट्रकचालक सुरज पटेल हा आरोपी शुभम नेमचंद राऊत च्या बहिणीला व्हाट्सएप व फेसबुक ने मेसेज करीत असल्याचा राग मनात धरून या रागाचा वचपा काढण्याचा राग मनात धरून आरोपितांनी संगनमताने योजना आखल्यानुसार सदर जख्मि ट्रक चालक हा नेरी गावाजवळील पेट्रोलपम्प समोरून कंटेनर ट्रक क्र एम एच 04 जे यु 9309 ने वाहतूक करीत असता सदर चारही आरोपीने ट्रक चालकाचा ट्रक थांबवून त्याला ट्रक खाली बोलाऊन त्याच्या ढुंगणावर तसेच हाताच्या पंजावर चाकूने वार करून गंभीर जख्मि केले व त्याच्याजवळील 16 हजार रुपये हिसकावून पळ काढला.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष वैरागडे व पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी त्वरित घटनास्थळ गाठून जख्मि सुरज पटेल ला पुढील उपचारार्थ नागपूर च्या मेयो रुग्णालयात हलविण्यात आले दरम्यान जख्मिने पोलिसांना दिलेल्या माहितीवरून सदर चारही आरोपीना ताब्यात घेत त्यांच्या विरुद्ध भादवी कलम 394, 341, 34 अनव्ये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.