हैदरी चौकातील रेडिमेड दुकानात 56 हजार 180 रुपयाचा मुद्देमाल जप्त

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 12 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील हैदरी चौकातील कुलूपबंद असलेल्या क्लब फॉक्स रेडिमेड दुकानात अज्ञात चार चोरट्याने दुकाणाच्या छतावरील दाराची कोंडी तोडून दुकानात अवैधरित्या प्रवेश करून दुकानातील रेडिमेड कपडे व इतर साहित्य असा एकूण 56 हजार 180 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना काल रात्री दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी हिमांशू दिपाणी वय 25 वर्षे रा दाल ओली क्र 2 कामठी ने पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अनोळखी चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com