नरखेड – अवैध दारू विक्री संबंधाने पो स्टे नरखेड येथे विशेष मोहिम राबविण्यात आली होती. सदर मोहिमेदरम्यान पोलीस निरीक्षक जयपालसिंह गिरासे यांचे सह पोलीस नाईक स्वप्नील बोंडे, हे पोस्टे परिसरात पेट्रोलींग करीत असता गुप्त बातमीदार मार्फत सावरगाव येथुन एक गुलाबी रंगाचे शर्ट घातलेला ईसम मोटर सायकलचे डिक्कीत देशी दारू बाळगुन सावरगाव ते काटोल रोडने गोंडी दिग्रसकडे अवैधरित्या देशी दारू घेवुन जात असल्याची मिळालेल्या माहिती वरून दुरक्षेत्र सावरगाव चौकी प्रमुख पोलीस हवालदार धनराज भुक्ते व तेथील स्टॉफ पोलीस नाईक सुधाकर शेंदरे, मनोज आगरकर, पोलीस शिपाई सचिन पब्बेवार यांचेसह सदर ठिकाणी जावुन सदर ईसमास थांबवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव दिनेश श्रीपतराव सेवतकर, वय 45 वर्ष, रा. गोंडी दिग्रस असे सांगितले. त्याचे ताब्यातील मोटार सायकल क्र.MH 36 – B – 1930 चे डिक्कीची तपासणी केली असता त्यामध्ये 14 निप देशी दारूच्या प्रत्येकी 180 एम.एल. एकुण किंमती 840 रू. व मोटर सायकल किंमती 30,000/-रू. असा एकुण 30,840/- रू. चा मुद्देमाल मिळुन आला.
तसेच सावरगाव येथील मोरू जैस्वाल यांचे देशी दारू विक्रीचे दुकानातुन एक पांढऱ्या रंगाचे शर्ट घातलेला ईसम मोटर सायकलचे डिक्कीत देशी दारू बाळगुन सावरगाव ते वंडलीकडे अवैधरित्या देशि दारू घेवुन जात असल्याची मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून दुरक्षेत्र सावरगाव चौकी प्रमुख पोलीस हवालदार धनराज भुक्ते व तेथील स्टॉफ पोलीस नाईक सुधाकर शेंदरे, मनोज आगरकर, पोलीस शिपाई सचिन पब्बेवार यांचेसह सदर ठिकाणी जावुन सदर ईसमास थांबवुन त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने आपले नाव माणिक सिताराम लांडगे, वय 51 वर्शे, रा. वंडली, ता. काटोल असे सांगितले. त्याचे ताब्यातील मोटार सायकल क्र. MH -40 -AB-9633 चे डिक्कीची तपासणी केली असता त्यामध्ये 24 निप देषी दारूच्या प्रत्येकी 180 एम.एल. एकुण किंमती 1,440/-रू. व मोटर सायकल किंमती 40,000/-रू. असा एकुण 41,440/- रू. चा मुद्देमाल मिळुन आला.
वरील दोन्ही गुन्हयातील देशी दारू विक्री दुकान चालकासह तिन्ही आरोपीतांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले असुन त्याचा पुढील तपास पोलीस हवालदार धनराज भुक्ते करीत आहेत.
सदरची कार्यवाही ही विजयकुमार मगर, पोलीस अधिक्षक, राहुल माकणीकर, अपर पोलीस अधिक्षक तसेच नागेश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी, काटोल विभाग काटोल यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक जयपालसिंह गिरासे, पोलीस हवालदार धनराज भुक्ते, पोलीस नाईक मनोज आगरकर, सुधाकर शेंदरे, स्वप्नील बोंडे, पोलीस शिपाई सचिन पब्बेवार यांनी पार पाडली.