कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत पुर्वेस चार किमी अंतरावर बोरडा टोल नाक्या जवळ तीन आरोपीतांनी कमल सकतेल ला बाॅटल, टायर च्या पान्याने व हाथ बुक्याने मारहाण करून जख्मी केल्याने कन्हान पोली सांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध करित आहे.
प्राप्त माहिती नुसार फिर्यादी कमल छोटेलाल समतेल वय ३४ वर्ष राह. जुनी छावनी गौतम नगर कामठी हा १० वर्षापासुन बोरडा टोल नाक्यावर लाईन मार्शल चा काम करीत आहे. मंगळवार (दि.७) जुन ला कमल सकतेल याची ड्युटी ४ ते १२ वाजता पर्यंत हा टोल नाक्यावर कर्तव्यावर असतांना सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान फोर व्हीलर गाडी क्र. एम एच ४९ बी एम ९१११ व दुसरी अज्ञात गाडी वाहन चालक व इतर यांचे भांडण होत असल्याने वाहनाची लाईन लागुन जाम झाल्याने कमल सकतेल हा गाडी क्र.एम एच ४९ बीएम ९१११ च्या चालकाला समजविण्याकरिता गेला असता ते गाडी मध्ये दारू पित होते. आरोपीनी कमल सकतेल यास पाहुण त्याला घेरले व त्यातील एका ने बियरची बाॅटल कमल सकतेल च्या पाठीवर मारली, दुसऱ्याने डोळ्याजवळ पंच मारला आणि तिसऱ्याने शिविगाळ करून टायर खोलण्याच्या पाण्याने डाव्या हातावर मारहाण केल्याने कमल सकतेल च्या उजव्या हातावर घाव व सुजन तसेच उजव्या डोळ्यावर सुजन आल्याने कमल सकतेल ने आपल्या मित्राला बोलावि ल्याने आरोपी तेथुन पसार झाले. सदर प्रकरणी कन्हा न पोलीसांनी फिर्यादी कमल छोटेलाल समतेल यांच्या तोंडी तक्रारीवरून तिन्ही आरोपी विरुद्ध अप क्र.३४९ /२२ कलम ३२४, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे अपराध पोलीस निरीक्षक विनायक कदम यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.