संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 12:-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या झेंडा चौक येरखेडा येथील कुंडकार कुटुंब काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने घरी कुणी नसल्याची संधी साधून दाराला लावलेला कुलूप तोडुन अवैधरित्या प्रवेश करुन घरातील गोदरेज आलमारीत सुरक्षित ठेवलेले नगदी 25 हजार रुपये व सोने चांदीचे दागिने अंदाजे किमती 19 हजार रुपये असा एकूण 44 हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना 8 ते 11 मार्च दरम्यान घडली असून यासंदर्भात फिर्यादी आशा कैलास कुंडाकार वय 57 वर्षे रा झेंडा चौक कामठी ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.