अल्पवयीन मुलींशी लैंगिक अत्याचार व विनयभं गाचे कराटे प्रशिक्षकावर ६ प्रकरणे दाखल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

 मुलींवर अतिप्रसंग व विनयभंग करणारा आरोपी गोपाल गोंडाणे अटक.

कन्हान : – कराटे प्रशिक्षक असलेल्या आरोपी नराध माने त्याच्याच क्लासमध्ये येत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थीनीशी अतिप्रसंग व विनयभंग केल्याने पीडीत एका मुलीच्या पालकांनी कन्हान पोलीस स्टेशन ला तक्रार दिल्याने कन्हान पोलीसानी वरिष्ठाच्या मार्गदर्श नात आरोपी गोपाल गोंडाणे विरूध्द विविध कलमा न्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केल्याने आण खी इतर पीडीत मुली व पालकांना हिमत येऊन तक्रार दिल्याने मुलींवर अतिप्रसंग व विनयभंग केल्याचे सहा प्रकरणे ना ग्रा पो अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात कन्हा न पोस्टे ला दाखल करून पुढील तपास सुरू असुन आणखी या नराधमाच्या पिडीत मुली असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या प्रकाराचा छळ कुणावरही झाला असल्यास त्यांनी स्वतः पुढे येऊन तक्रार द्यावी. असे आवाहान महिला मसपोनि निशा भुते हयानी केले आहे.
प्राप्त माहिती नुसार आरोपी गोपाल रामेश्वर गोंडाने (४०) राह. विवेकानंद नगर, कन्हान हा कराटे प्रशिक्षक असुन दररोज सकाळी ४ ते ५ पर्यंत रनिंग, व्यायाम तसेच सायंकाळी ७ ते ८ कराटेचे क्लासेस घ्यायचा. पीडिता त्याच्या कराटे क्लासेस मध्ये जात होती. घटनेच्या दिवशी आरोपीने पीडीतेस आपल्या दुचाकीवर बसवुन तो क्लासेस कडे न जाता खंडाळा शिवारातील ओवर ब्रिजच्या खाली नेऊन बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. पीडीतेने ही बाब आपल्या आईस सांगितल्याने फिर्यादी आईने कन्हान पोलीस स्टेशन गाठुन तक्रार दिलेल्याने कन्हान पोलिसांनी आरोपी गोपाल गोंडाने याच्या विरुद्ध विविध कलमान्व ये गुन्हा दाखल करून त्यास अटक करून महिला पो उपनि लक्ष्मी मल्कुवार या तपास करीत असताना या प्रकरणात पीडीत मुलीच्या तकारीने आरोपीस अटक केल्याचे माहित झाल्याने आरोपी विरूद्ध दुसऱ्या मुलींनी तकार देण्याची हिंमत केली.
दुसरा गुन्हा सदर आरोपी विरूद्ध दि.७/०६/२० २२ चे २.२५ वा. अप क्र. ३४३/२०२२ कलम ३७६, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला. यामध्ये मौजा गहुहिवरा रोड येथे दि.१२/१२/२०२१ चे सकाळी ४.३० वा. चे सुमारास पीडित मुलगी वय २० वर्ष व आरोपी गोपाल गोंडाने हे विद्यार्थी व कराटे प्रशिक्षक असुन फिर्यादी ही कराटे शिकण्यास आली असता ति ला कराटेचे काही स्टेप शिकवण्याचे बहाण्याने घेवुन जावुन तिचेवर अतिप्रसंग केले. तसेच सदर बाब कुणा ला सांगितले तर जिवे मारण्याची धमकी दिली. अश्या फिर्यादी यांचे तक्रारीने मसपोनि निशा भुते या पुढील तपास करीत आहे.
तिसरा गुन्हा वरील आरोपी विरूद्ध दि. ७/०६/ २०२२ चे १५.५२ वा विनयभंगचा गुन्हा नोंद केला. या त गहुहिवरा रोड येथे दि.२७/०३/२०२२ चे सकाळी ४.३० वा ते दि.३०/०५/२०२२ चे सकाळी ५.३० वा. चे दरम्यान अल्पवयीन पीडित मुलगी वय १५ वर्ष व आरोपी गोपाल रामेश्वर गोंडाने हे विद्यार्थी व कराटे प्रशिक्षक असुन अल्पवयीन फिर्यादी ही कराटे क्लास ला गेली असता, आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे बोलुन तिचा विनयभंग केला. या प्रकरणी फिर्या दी चे रिपोर्टवरून पो.स्टे.कन्हान येथे आरोपी विरूध्द अप क्र. ३४४/२०२२ कलम ३५४ (अ) भादंवि सह कलम ८, १२ बाल लैगींक अत्याचार प्रतिबंधक काय द्यान्वये गुन्हा दाखल करून मसपोनि निशा भुते या पुढील तपास करीत आहे.
चौथा गुन्हा आरोपी विरुद्ध दि. ७/०६/२०२२ चे २०.३४ वा. विनयभंग चा गुन्हा नोंद करण्यात आला. यामध्ये गहुहिवरा सर्विस कन्हान, गोंडेगाव वाचनालय येथे दि.२८/०५/२०२२ चे सकाळी ४.३० वा. ते दि. ३१/०५/२०२२ चे सकाळी ४.३० वा.चे दरम्यान अल्प वयीन पीडित मुलगी वय १७ वर्ष व आरोपी गोपाल गोंडाने हे विद्यार्थी व कराटे प्रशिक्षक असुन अल्पवयी न फिर्यादी ही कराटे क्लासला गेली असता, आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे तक्रारीने पो.स्टे.कन्हान ला आरोपी विरुध्द अपक्र.३४६/२०२२ कलम ३५४ (अ) भादंवि सहकलम ८, १२ बाल लैगीं क अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून मसपोनि शुभांगी वाजे या पुढील तपास करीत आहे.
पाचवा गुन्हा वरील आरोपी विरूद्ध दि.७/०६/ २०२२ चे २१.४८ वा. विनयभंगचा गुन्हा नोंद करण्या त आला. यामध्ये गहुहिवरा सर्विस कन्हान, गोंडेगाव वाचनालय येथे दि. २८/०५/२०२२ चे सकाळी ४.३० वा.ते दि.३१/०५/२०२२ चे सकाळी ४.३० वा.चे सुमा रास अल्पवयीन पीडित मुलगी वय १५ वर्ष व आरोपी गोपाल गोंडाने हे विद्यार्थी व कराटे प्रशिक्षक असुन अल्पवयीन फिर्यादी ही कराटे क्लास ला गेली असता, आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे तक्रारीने पो.स्टे.कन्हान येथे आरोपी विरुध्द अप क्र. ३४८/२०२२ कलम ३५४ (अ) भादंवि सहकलम ८, १२ बाल लैगीक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून मसपोनि शुभांगी वाजे या पुढील तपास करीत आहे.
साहावा गुन्हा वरील आरोपी विरुद्ध दि. ८/०६/ २०२२ रोजी विनयभंगचा गुन्हा नोंद करण्यात आला. यामध्ये गहुहिवरा सर्विस रोड कन्हान येथे दि.६ /१०/ २०१९ चे ६.३० वा. ते दि. ७/१०/२०१९ चे ११ वा.चे सुमारास अल्पवयीन पीडित मुलगी वय १७ वर्ष व आरोपी गोपाल गोंडाने हे विद्यार्थी व कराटे प्रशिक्षक असुन अल्पवयीन फिर्यादी ही कराटे क्लासला गेली असता यातील आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. सदर प्रकरणी फिर्यादी यांचे तक्रारीने पो.स्टे, कन्हान येथे आरोपी विरुध्द अप क्र.३५१/२०२२ कलम ३५४ (अ) भादंवि सहकलम ८, १२ बाल लैगींक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू असुन या प्रकाराचा छळ कुणावरही झाला असल्यास त्यांनी स्वतः पुढे येऊन तक्रार द्यावी. असे आवाहान महिला मसपोनि निशा भुते हयानी केले आहे.

Next Post

केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहचून पक्षसंघटन अधिक बळकट करावे --शुभांगी गायधने

Thu Jun 9 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 9: भाजप महिला कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विविध योजना समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोचून पक्षसंघटन अधिक बळकट करण्याचे आव्हान नागपूर जिल्हा भाजप महिला आघाडी महामंत्री शुभांगी गायधने यांनी कामठी तालुका भाजप महिला आघाडीच्या वतीने सिंहासन बालाजी मंदिर सभागृह तेलीपुरा येथे आयोजित सेवा सुशासन व गरीब कल्याण योजना कार्यक्रमात मार्गदर्शन करताना व्यक्त केले देशाचे पंतप्रधान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com