सहायक पोलिस निरिक्षक सह एका खाजगी इसमाला लाच स्वीकारताना अटक

अमरदिप बडगे

गोंदिया / आमगाव – गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत सहाय्यक पोलिस निरिक्षक व एका खाजगी इसमाला लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.
आमगाव येथिल तक्रारदार हा आधी जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यामुळे त्याच्या विरोधा आमगाव पोलिसात तक्रार आली असुन त्या वर गुन्हा दाखल होणार असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगीतले त्यासाठी तक्रारदार याला गुन्हा दाखल न करण्यासाठी 5 लाख रुपये लाचेची मागणी एका खाजगी इसमा मार्फत करण्यात आली. तडजोडी अंती 2 लाख रुपये देण्याचे ठरले. पण तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यानी याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार सापळा रचत आरोपी सहाय्यक पोलिस निरिक्षक श्रीकांत पवार, व खाजगी इसम अनील सोनकनवरे, याला लाचेचा पहिला हफ्ता म्हणुन 1 लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ अटक करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कंत्राटदाराच्या जेसीबीने मुख्य पाईपलाईन फोडली रामगडात पूरसदृश्य स्थिती

Mon Jun 13 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी प्रतिनिधी १३ जून – नवी कामठी भागात पाणी पुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन कंत्राटदाराच्या जेसीबीने क्षतीग्रस्त झाल्याने रविवारी लाखो लिटर पाणी आनंद नगर रामगड भागात तील अंतर्गत रस्त्यावर ओसंडून वाहत होते. पाईपलाईन फुटल्याने भर उन्हाळ्यात रामगड आनंद नगर भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली कंत्राटदाराच्या दुर्लक्षामुळे जेसीबीने पाईपलाईन क्षतीग्रस्त झाली.परंतु कंत्राटदार अथवा कोणीही क्षती ग्रस्त पाईपलाईन पाहण्यासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights