दिग्गजांनी जागवल्या दिलीप कुमार यांच्या आठवणी

-सुभाष घई यांनी कू वर शेअर केले हळवे क्षण

मुंबई : सिनेमाच्या दुनियेत आपल्या स्वतंत्र प्रतिभेने मुद्रा उमटवणारे अभिनेते म्हणजे दिलीप कुमार. दिलीप कुमार यांची 99 वी जयंती सुभाष घई यांच्या इन्स्टिट्युटमध्ये साजरी झाली.

दिलीप कुमार यांना त्यांचे चाहते खूप मिस करत आहेत. सुभाष घई यांच्या इन्स्टिट्युटमध्ये झालेल्या कार्यक्रमात दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो आणि अभिनेता धर्मेंद्र यांनी स्मृतींना उजाळा दिला. सायरा बानो दीर्घ काळानंतर घराबाहेर निघाल्या. या कार्यक्रमात घई यांच्या ‘व्हिसलिंग वुड्स’मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दिलीप कुमार यांच्या पेंटिंग्जही बनवल्या.

या कार्यक्रमाबाबत कू करताना सुभाष घई यांनी लिहिलं, आज व्हिसलिंग वुड्समध्ये आमच्यासाठी एक भावुक करणारा खास दिवस उजाडला होता. आम्ही आपल्याला सोडून गेलेले एक महान कलावंत दिलीप कुमार यांची जयंती साजरी केली. मी त्यांच्यासोबत ‘विधाता’, ‘कर्मा’, ‘सौदागर’ अशा सिनेमांमध्ये काम केले. आम्ही सगळेच दिलीप कुमार यांच्या कायम ऋणात असू…’

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

शहरातील ७५ भिंती रंगणार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी रंगात

Wed Dec 15 , 2021
महापौर दयाशंकर तिवारी यांची संकल्पना : तीन विविध विषयांवर स्पर्धा नागपूर : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवर्षनिमित्त नागपूर शहरात अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. महापौर दयाशंकर तिवारी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरातील ७५ भिंती स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी रंगात रंगविण्याची स्पर्धा लवकरच मनपातर्फे आयोजित करण्यात येणार आहे.             या स्पर्धेच्या आयोजनाबाबत मंगळवारी (ता.१४) मनपा मुख्यालयातील महापौर सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीत महापौर दयाशंकर तिवारी, अतिरिक्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com