कौतुकास्पद ! भटकलेल्या 22 वर्षीय तरूणीला महिला पोलिसांनी सुखरूप घरी पोहोचवले

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 28:-मुंबई वरून कामठी शहरात आलेल्या आणि भरकटलेल्या एका 22 वर्षीय तरुणीला नवीन कामठी पोलीस स्टेशन च्या महिला पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर व शिपाई सविता शिंगाडे या पोलिसांनी सुखरूप पोहोचवले आहे. पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत कामठी बस स्टँड चौकातील दुबे महाराज लस्सी सेंटर समोर एक अनोळखी 22 वर्षीय तरुणी कित्येक वेळ ताटकळत उभी असून आता माझे नातेवाईक येतील ,मला सोबत घेऊन जातील या आशेत ती प्रतीक्षेत उभी होती. मिळेल त्याच्या वाहन थांबवून मदतीची याचना करीत होती.बरेच लोकं हिला वेड लागलंय अशी समज करीत होते. मात्र या वर्दळीच्या ठिकाणी बराच वेळ पर्यंत ही तरुणी थांबल्यास हिच्याशी कुठलीही अनुचित घटना न हो यासाठी तेथील एका जागरूक नागरीकानी पोलीस उपनिरीक्षक गीता रासकर यांना माहिती देत मदतीची मागणी केली.दरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी वेळेचा कुठलाही विलंब न करता घटनास्थळी पोहोचण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर ती कामठी रेल्वे स्टेशन समोर पोहोचलो होतो तर एका पांनठेवल्यावर बसून नातेवाईकांची प्रतीक्षा करीत होती त्याचवेळी ते जागरूक गृहस्थ व पोलीस त्या तरुणीकडे पोहोचून तिची आपबीती ऐकून तिला सुखरूप घरी पोहोचविण्याचे आश्वासित केले.पोलिसांनी तिची ओळख पटवून घेत प्रवास मार्गाने भरकटल्या त्या तरुणीला सुखरूप घरी पोहोचवून आपल्या कर्तव्यदक्ष भूमिकेतून माणुसकीचा धर्म जोपासला.दरम्यान त्या भरकटल्या तरुणीला पोलिसांची वेळीच मदत मिळाल्याने या दोन्ही महिला पोलिसांचे भरल्या डोळ्यांनी आभार मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

वेकोलिच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तात्काळ निकाली काढा - सुनील केदार

Thu Apr 28 , 2022
दिनेश दमाहे,मुख्य संपादक – भूसंपादनाच्या मोबदल्याचा आढावा नागपूर, दि. 28 : वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी तसेच भूसंपादनाच्या मोबदल्याच्या प्रलंबित प्रकरणांचा तात्काळ निपटारा करा, अशा सूचना पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिल्या. कोटोडी, पटकाखेडी व ऐरणगाव यथील प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत आज विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, जिल्हाधिकारी आर. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com