स्पर्धा परीक्षा शुल्क तिनशेवरून हजारावर पोहोचले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- आजच्या स्थितीत कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागातील शिक्षित तरुणांना शासकीय नोकरीचे वेध लागले असून अभ्यासातून शासकीय नोकरी मिळविणारच असा ध्येय निश्चित करून येथील तरुणाई मंडळी या तारुण्यवयातील स्थितीला नियंत्रणात ठेवून अभ्यासाकडे लक्ष केंद्रित ठेवून ठिकठिकाणी उघडलेल्या स्पर्धात्मक परीक्षा अभ्यास केंद्र तसेच वाचनालयात जाऊन अभ्यास करून उज्वल भविष्याची कास धरण्यासाठी प्रयत्नशील आहेत.हे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी कुठली नोकरी वा व्यवसाय करीत नाही त्यांना अभ्यासाकरिता लागणारा खर्च कसाबसा घरमंडळीकडून जुगाड करावा लागतो.अशा परिस्थितीतही परीक्षा क्षुल्क हे तिनशेवरून थेट हजारा पर्यंत पोहोचल्याने विद्यार्थ्यांना हा खर्च झेपणारा नाही आहे तेव्हा याचा विचार सरकारने गांभीर्याने करावा अशी मागणी येथील स्पर्धात्मक परीक्षा अभ्यास केंद्रातील विद्यार्थ्यांनी केला आहे.

सरकारने यावर विचार करून परीक्षा क्षुल्क कमी केल्यास स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षा स्पर्धेतून निर्माण होणाऱ्या आपल्या भविष्याची स्वप्न पाहू शकतील. परीक्षा क्षुल्क वाढलेल्या स्थितीत विद्यार्थ्यांना आता नोकरीच्या जागा तर निघाल्या पण परीक्षा क्षुल्क बघून मनाची धडकी भरते की एवढी रक्कम आणायची कुठून, घरमंडळी पण किती मदत करतील.तेव्हा विद्यार्थ्यांची ही मनस्थिती गांभीर्याने लक्षात घेता परीक्षा क्षुल्क कमी करण्यात यावा अशी मागणी बेरोजगार विद्यार्थ्यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शिवसेना कार्यालयात BRS पक्षात शिवसैनिकांचा प्रवेश

Mon Jul 3 , 2023
नागपूर :- भारत राष्ट्र समितिचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या विचाराला समर्थन व पुर्व विदर्भ समन्वयक प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांना आपले आदर्श ठेवून शिवसेनेचे मनोज जरेल यांनी रविकांत खोब्रागडे समन्वयक नागपुर शहर जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली BRS पक्षात शिवसेनेचे अनेक कार्यकर्तासह पक्ष प्रवेश घेण्यात आला. या पक्ष प्रवेश सोहळ्यात मनोज जरेल, रवी अन्ना, नशीर खान, फैय्याज शेख, ईशांत अरोडकर, विलास पुणेकर, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com