नागपूर :- दिनांक २४.०५.२०२३ २१.४५ वा. दरम्यान गुन्हे शाखा युनिट क. ३ चे अधिकारी व कर्मचारी यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहिती वरून सापळा रचुन आय. पी. एल क्रिकेट टूर्नामेन्ट दरम्यान मुंबई विरुध्द लखनउ टि २० मॅचवर फोनवरून पैश्याचा हारजित स्विकारून जुगार खेळणारे आरोपी १) प्रविण गोपीचंद लुटे वय ३९ वर्ष रा. तुळशीबाग रोड, नागेश्वर मंदीर जवळ, कोतवाली २) आरोपी नामे परेश सारवाणी रा. वर्धमान नगर, लकडगंज यांचेवर पोलीस ठाणे लकडगंज हद्दीत लॉट नं. ४३६, गरोबा मैदान समाधान गार्डन जवळ तितरमारे याचे घरी कारवाई केली. तेथे आरोपी हा पाहिल्या आरोपीचे मदतिने फोनद्वारे क्रिकेट सट्टयावर खाववाडी करतांना मिळुन आल्याने आरोपीस ताब्यात घेतले. आरोपीचे ताब्यातुन मल्टीमॉडेल व मोबाईल एकुण २५ नग, एल.जी. कंपनीचा एक टिव्ही सेट सँप वॉक्स, डोंगल, चार्जर, नोंदी केलेले मॅचचे सौदे असलेले कागदपत्रे व रोख २,५०० /- रु असा एकूण ५२.५१०/-रूचा मुद्देमाल जप्त केला. आरोपीविरुध्द कलम ४, ५ महा जुगार प्रति, कायदा अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली आहे. आरोपीस मुद्देमालासह पुढील कारवाईस्तव लकडगंज पोलीसांनी ताब्यात देण्यात आले आहे. वरील कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) संजय पाटील, पोलीस उप आयुक्ता डिटेक्शन) मुम्मका सुदर्शन, सहायक पोलीस आयुक्त मनोज सिडाम यांचे मार्गदर्शनाखाली पोनि महेश सागडे, सपोनी, पवन मोरे, सचिन भोडे, पोहवा मुकेश राउत, प्रविण लाड, अनुप तायवाडे, नापोअ अमोल जासुद, संतोष चौधरी व अनिल बोटरे यांनी केली.