निरामय जीवनशैली कार्यपद्धती कार्यशाळा शुक्रवारी, डॉ. हेमंत ओस्तवाल यांचे मार्गदर्शन

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेतर्फे मनपासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढविण्यासाठी तसेच ताण तणावाचे व्यवस्थापन करण्यासाठी निरामय जीवनशैली कार्यपद्धतीबद्दल उद्या शुक्रवारी १६ जून रोजी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये सकाळी १० वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यशाळेत मोटिव्हेशनल स्पीकर, आरोग्य विषयक मार्गदर्शक नाशिक येथील डॉ. हेमंत ओस्तवाल हे मार्गदर्शन करतील. यावेळी मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांची विशेष उपस्थिती असेल. कार्यशाळेमध्ये नागपूर महानगरपालिकेसह अन्य शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे कुटुंबिय देखील सहभागी होउ शकतात.

मोटिव्हेशनल स्पीकर, आरोग्य विषयक मार्गदर्शक डॉ. हेमंत ओस्तवाल यांनी आतापर्यंत भारतातील विविध भागांमध्ये सुमारे ७०० कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केले आहे. विशेष म्हणजे त्यांना निरामय जीवनशैली करिता राष्ट्रपती भवन येथे सुद्धा आमंत्रित करण्यात आले होते. विविध वर्तमानपत्रांमध्ये त्यांचे आरोग्य विषयक अनेक लेख प्रसिद्ध झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी हजारो विद्यार्थी, पालक आणि अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले आहे. विविध संस्था तसेच नागरिकांकरिता १००० हून अधिक आरोग्य शिबिरांचे त्यांनी आयोजन केले आहे.

मनपासह अन्य शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये काम करताना अधिकारी, कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढावी, त्यांच्या कामात सुसूत्रता यावी, ताण तणावाचे व्यवस्थापन करून निरामय जीवनशैलीचा अंगीकार करणे अत्यंत आवश्यक आहे. या हेतूने मनपाद्वारे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये मनपासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमधील अधिकारी, कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी उपस्थित रहावे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ताईक्वांडो खिलाड़ियों को मिली सफलता

Thu Jun 15 , 2023
नागपुर :- बेटियां शक्ति फाउंडेशन नागपुर द्वारा संचालित गोटाडपांजरी वेलाहारी द्वारा चलाए जा रहे ताईक्वांडो प्रशिक्षण केंद्र से समृद्धि गोमासे, यानिध्य वासनिक, अंशिका सावरकर, तन्मय निनावे इन चार प्रशिक्षणार्थियों ने सतारा में हुए ब्लैक बेल्ट प्रमाणपत्र परीक्षा में सफलता प्राप्त की हैं। इन प्रवीण्यप्राप्त प्रशिक्षणार्थियों को दक्षिण नागपुर के विधायक, ताईक्वांडो असोसिएशन अध्यक्ष मोहन मते के हस्ते ब्लैक बेल्ट वितरित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com