संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र – आगामी होऊ घातलेल्या कामठी नगर परिषद निवडणूका ह्या ओबीसी आरक्षणासह होणार आहेत.त्यानुसार नुकतेच पार पडलेल्या ओबीसी आरक्षण सोडत कार्यक्रमात एकूण 17 प्रभागातून 10 अनुसूचित जाती, एक अनुसूचित जमाती तर सहा जागा ह्या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग साठी आरक्षित झाले आहेत यातील अनुसुचित जातीतील एकूण 10 जागांपैकी 5 जागा ह्या अनुसूचित जाती महिला साठी राखीव आहेत तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग च्या सहा जागेतून तीन जागा ह्या ओबीसी महिलांसाठी आरक्षित असून इतर 9 जागा ह्या सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत.वेळीच ओबीसी आरक्षण लागू झाल्याने नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीमुळे नगर परिषद च्या निवडणुकीचे गणित बदलले आहेत त्यामुळे राजकीय पक्षांना नव्याने फेरमांडणीची वेळ आली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रमात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गासाठी सर्वसाधारण प्रवर्ग बदलवून प्रभाग क्र 1,2, 6,7,8, 11 हे सहा प्रभाग ओबीसीसाठी आरक्षित करण्यात आले त्यातील प्रभाग क्र 2,8, 11 हे तीन प्रभाग ओबीसी महिला तर प्रभाग क्र 1, 6,7 हे ओबीसी साठी आरक्षित झाल्याने अनेक इच्छुक उमेदवारांना निवडणूक लढविन्यासाठी दुसऱ्या प्रभागाचा शोध घ्यावा लागत आहे तसेच उमेदवार बदलीसाठी घोडदौड सुरू झाली आहे.तसेच राखीव जागेवरील इच्छुक उमेदवारांनी नगर परिषद निवडणुकीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी संबंधित विभागात धावपळ करताना दिसत आहेत.