अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा बनला पीएसआय

– संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 11:- महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत कामठी तालुक्यातील नान्हा मांगली गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याचा मुलगा राहुल देवचंद चौधरी ने ओबीसी प्रवर्गातून उत्तीर्ण होऊन यश खेचत पीएसआय होण्याचे स्वप्न पूर्ण केले.दरम्यान नान्हा मांगली गावातील पहिला राज्यसेवा अधिकारी झाल्यानें राहुल चौधरी चे सर्वत्र कौतुक होत अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पीएसआय राहुल देवचंद चौधरी हा जवळपास 28 वर्ष वयाचा असून नान्हा मांगली गावातील अल्पभूधारक सर्वसाधारण शेतकऱ्याचा पुत्र आहे.राहुल हा आधीपासूनच अभ्यासात हुशार असून तो नवोदय परिक्षा उत्तीर्ण करून नवोदय मध्ये प्रवेश मिळवून प्रखरपणे अभ्यास सुरू केला.अतिशय खडतर प्रवास करून राहुल आज राज्यसेवा अधिकारी बनला याबद्दल नान्हा मांगली गावात उत्साहाचे वातावरण असून सर्वांना अभिमानास्पद वाटणारी बाब आहे.ही गोड बातमी हवेसारखी पसरताच राहुल वर गुलालाची उधळण करीत गावात जल्लोष साजरा करण्यात आला.
राहुल च्या यशाबद्दल गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिकांसह कुटुंबीय सदस्य , मित्रमंडळी आदींनी अभिनंदनाचा वर्षाव करीत राहुल चे कौतुक केले.राहुल ने आपल्या यशाचे श्रेय आई -वडील,गुरुजन, शिक्षकगण तसेच सहकारी मित्रांना दिले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषद व्दारे शिक्षण सभापती भारती पाटील हिरकणी पुरस्काराने गौरव

Fri Mar 11 , 2022
कन्हान : – डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परि षद व्दारे जागतिक महिला दिना निमित्त राज्य स्तरावर प्रत्येक जिल्हयातील निवडक महिलेला हिरकणी पुर स्काराने सन्मानित करण्यात आले. याच उपक्रमातुन नागपुर जिल्यातील शिक्षण सभापती भारती पाटील  याना हिरकणी राज्य पुरस्काराने गौरवविण्यात आले.            डॉ पंजाबराव देशमुख राष्ट्रीय परिषद व्दारे जागतिक महिला दिवसा निमित्य राज्य स्तरावर प्रति वर्षी क्रिडा, शिक्षण , […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com