मैत्री करून रेल्वे तिकीट पळविली अन् रद्द करून रक्कम घेतली

– आरोपीची वाट बघत राहीला प्रवासी  

नागपूर :- रेल्वे तिकीट काढण्यासाठी गाडी नंबर लिहायचे आहे, अशी थाप मारून प्रवाशाचे रेल्वे तिकीट घेतले आणि क्षणभरातच गायब झाला. प्रवासी त्याच्या प्रतिक्षेत होता. मात्र, तो आलाच नाही. त्याने इतवारी रेल्वे स्थानकाच्या तिकीट केंद्रावर तिकीट रद्द करून रक्कम घेतली. फसवणुकीचा हा प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर घडला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला आहे.

मनीष पुरोहित (43) रा. राजस्थान असे फिर्यादीचे नाव आहे. त्याचे नागपुरात सासर आहे. रविवारी तो पत्नीसह सासरी आला होता. 3 ऑगस्टला त्यांना निघायचे असल्याने तो नागपूर रेल्वेस्थानकाच्या तिकीट आरक्षण केंद्रावर तिकीट काढण्यासाठी गेला. याठिकाणी त्याला एक व्यक्ती मिळाला. मनीषने रेल्वे तिकीट काढण्यासाठी त्याच्याकडून फार्म भरून घेतला. त्याने तिकीट काढण्यासाठी मनीषला मदत केली. 3 ऑगस्टच्या एसी-2 च्या तीन तिकीट काढल्या. सात हजार रुपयांचे तिकीट झाले.

तिकीट काढण्यासाठी आरोपीने मदत केली, त्यामुळे मनीष त्याला चहासाठी घेवून गेला. दोघांनीही सोबत चहा पिली. दरम्यान आरोपीने मनीषकडून तिकीट घेतली. मला सुध्दा जोतपुरला जायचे आहे. गाडी नंबर लिहण्यासाठी तिकीट द्या असे म्हटले. मनीषने साध्या मनाने त्याला तिकीट दिले. आरोपी तिकीट घेवून आरक्षण तिकीट केंद्राच्या दिशेने गेला. मात्र, बराच वेळ होवूनही तो परतला नाही, तेव्हा मनीषचा संशय वाढला. मनीष त्याला तिकीट आरक्षण केंद्रात शोधायला गेला. स्टेशन परिसरात शोधले. तो कुठेच आढळून आला नाही तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे मनीषच्या लक्षात आले. मनीषने लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून सारा प्रकार सांगितला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मनीषच्या तक्रारीवरून आरोपी विरूध्द गुन्हा नोंदविला.

आरोपीने गाठले इतवारी रेल्वे स्थानक

आरोपी तातडीने इतवारी रेल्वे स्थानकाच्या तिकीट केंद्रावर गेला. रेल्वे तिकीट रद्द करून पूर्ण रक्कम घेतली आणि फरार झाला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपीची ओळख पटली. त्याच्या शोधासाठी एक पथक तयार करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

‘पौर्णिमा दिवसा’निमित्त रामदासपेठ परिसरात जनजागृती

Thu Aug 3 , 2023
– एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करून नागरिकांचे सहकार्य नागपूर :- नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या सहकार्याने मंगळवारी (ता.१) रामदासपेठ येथील कल्पना बिल्डिंग टी-पॉईंट परिसरात पौर्णिमा दिवसाच्या निमित्ताने जनजागृती करण्यात आली. वीज बचतीसाठी माजी आमदार तथा माजी महापौर प्रा. अनिल सोले यांच्या मार्गदर्शात पौर्णिमा दिवस या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरूवात करण्यात आली. कल्पना बिल्डिंग परिसरामध्ये ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com