चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ‘ जागरुक पालक, सुदृढ बालक ’ अभियानाची सुरवात  

० ते १८ वर्ष वयोगटातील मुलांची होणार आरोग्य तपासणी

चंद्रपूर :- राज्यातील सर्व (ग्रामीण, शहरी व मनपा विभाग) ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ या विशेष अभियानाचे उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आभासी पद्धतीने करण्यात आले तर चंद्रपूर मनपा क्षेत्रासाठी सहायक आयुक्त विद्या पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून ‘जागरूक पालक-सुदृढ बालक’ अभियानाची सुरवात करण्यात आली.

याप्रसंगी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. अश्विनी भारत,डॉ. नरेंद्र जनबंधु, नागेश नीत व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत डॉ. गेश्री कोरडे, डॉ. मंगेश भरडकर उपस्थीत होते. 

या अभियान कालावधीत चंद्रपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ० ते १८ वर्ष वयोगटातील मुला-मुलींची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहेत. हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी महापालिका आयुक्त विपीन पालीवाल यांच्या अध्यक्षेतेखाली सिटी टास्क फोर्स स्थापन करण्यात आला असून अभियान यशस्वी करण्यासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले आहे.

 १२ पथके, २०१ शाळा, १५० अंगणवाडी, ६९५२७विद्यार्थी 

मनपा कार्यक्षेत्रात हे अभियान यशस्वी करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत सुव्यवस्थित नियोजन करण्यात आले असून मनपा क्षेत्रात शासकीय, अनुदानीत, खाजगी, दिव्यांग विशेष अशा शाळा. बालगृहे, अनाथालये, आश्रमशाळा अशा विविध २०१ शाळांच्या ठिकाणी ५४९६१ बालके असून एकूण १५० अंगणवाडींच्या ठिकाणी १४५६६ बालके आहेत. त्यास अनुसरून राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत आरोग्य पथक तसेच मनपा आरोग्य संयुक्तरीत्या १२ पथकांव्दारे अभियान ५२ दिवस ते २ महीने राबविले जाणार आहे.

अभियानाच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने सर्व वैद्यकीय अधिकारी, एनएम, एलएचव्ही, एएनएम, शाळा समन्वयक व आशा स्वयंसेविका यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय दैनंदिन तपासणी कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. आयएमए व आयएपी यांची सभा घेण्यात आलेली आहे. तसेच अंगणवाडी सेविका, शिक्षक यांचीही सभा घेण्यात आली आहे.

तपासणी ते उपचाराचे नियोजन –

प्रथमस्तर तपासणीत वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एलएचव्ही, आरोग्य सहायक यांच्यास्तरावर तपासणी होईल.आवश्यकता भासल्यास दुसऱ्यास्तरावर शासकीय वैद्यकीय रुग्णालय,वैद्यकीय अधीक्षक, बालरोग तज्ज्ञ, भिषक, स्त्रीरोग तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, नेत्र शल्यचिकित्सक, नेत्र चिकित्सा अधिकारी, दंतरोग तज्ज्ञ यांच्या स्तरावर तपासण्या व उपचार होतील. पुढील टप्प्यात आवश्यकता भासल्यास बालकास संदर्भसेवा, उच्चस्तरीय उपचार व शस्त्रक्रिया इ. सेवा दिल्या जातील.

अशा होतील तपासण्या –

या अभियानात बालकाची संपूर्ण आरोग्य तपासणी होईल. वजन उंची नुसार बालकाची सुदृढता मोजली जाईल, जन्मजात व्यंग असल्यास ते तपासणे, रक्तक्षय, डोळ्यांचे आजार, गलगंड, स्वच्छ मुख अभियान, दंतविकार, हृदयरोग, क्षयरोग, कुष्ठरोग, कॅन्सर, अस्थमा, एपिलेप्सि इ. आजारांचे संशयित रुग्ण ओळखून त्यांना संदर्भित केले जाईल. याशिवाय ऑटीझम, विकासात्मक विलंब इ. मानसिक स्वरुपाच्या आजारांवरही उपचार केले जातील.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विज्ञान प्रदर्शनी एवं रक्तदान शिविर का आयोजन

Fri Feb 10 , 2023
नागपुर :- प्रयास एक स्वयंसेवी संस्था है जो विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थान (वीएनआईटी), नागपुर के छात्रों के एक समूह द्वारा बनाया गया है। एनजीओ के छात्रों ने नागपुर महानगरपालिका (एनएमसी) और शहर के सरकारी स्कूलों के सहयोग से एक रक्तदान शिविर और एक बुनियादी विज्ञान प्रदर्शनी का आयोजन किया।वीएनआईटी परिसर में रक्तदान शिविर का आयोजन किया गया। सरकारी मेडिकल कॉलेज […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com