पाचव्या दिवशीही महसूल कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरूच

संदीप कांबळे, कामठी
कार्यालयात पडला शुकशुकाट, महसूल विभागाची कामे खोळंबली
कामठी ता प्र 8:-अव्वल कारकून , मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गात पदोन्नती मागील दोन वर्षांपासून होत नसल्याने तसेच महसूल सहाय्यकाचे रिक्त पदे भरण्यात येत नसल्याने मंत्रालय स्तरावर अव्वल कारकून संवर्गातील पदोन्नतीचे प्रलंबित असलेले प्रस्ताव विभाग निहाय मान्यता देऊन नायब तहसिलदार पदी पदोन्नतीचे आदेश तात्काळ काढावेत, महसुल सहाययकाची रिक्त पदे तातडीने भरावीत या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेने 4 एप्रिल पासून बेमुद्दत राज्यस्तरीय आंदोलन पुकारले असून या आंदोलनाला कामठी तहसील कार्यालयातील महसूल कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवित बेमुद्दत आंदोलन पुकारले आहे. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी कामठी तहसील कार्यलयात शुकशुकाट दिसून आला असून कार्यालयातील कामकाज ठप्प पडले आहेत.
महसुल कर्मचाऱ्यांच्या या बेमुद्दत आंदोलनामुळे शासनाच्या मोठ्या प्रमानात महसुल बुडाला. तर कार्यालय संबंधित कामे असणाऱ्या नागरिकांना उलटपायी परत जावे लागत आहे तर कार्यालये ओस पडले असून आजच्या आंदोलनाच्या पाचव्या दिवशी तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गाव हाच परिवार समजून काम करा - आमदार संजय रायमूलकर

Fri Apr 8 , 2022
संदीप कांबळे, कामठी – पंचायत राज समितीची कामठी पंचायत समितीला भेट कामठी ता प्र 8:- ग्रामविकासामध्ये सामूहिकतेची भावना आहे.गावाच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही त्यामुळे सर्वांनी सामूहिकतेची भावना जाणून घेत गाव हाच परिवार समजून सर्वांनी कर्तव्यदक्ष भूमिका साकारावी असे मौलिक प्रतिपादन पंचायत राज समिती चे अध्यक्ष आमदार संजय रायमूलकर यांनी आज कामठी पंचायत समिती ला दिलेल्या पीआरसी दौऱ्याभेटीत व्यक्त केले.तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com