श्रीकृष्ण, गणपती बाप्पाच्या आगमनासाठी मुर्तीकार सज्ज

अमरदिप बडगे , प्रतिनिधी 

गोंदिया: – पुढील महिन्यात भगवान श्रीकृष्ण व बाप्पाचे आगमन होणार आहे. तसेच त्यांच्या मुर्ती तयार करण्याच्या कामालाही सुरूवात झाली. ठिकठिकाणी श्री कृष्ण आणि बाप्पाच्या मुर्ती बनविण्याच्या कामात मुर्तीकार व्यस्त झाले असल्याचे दिसुन येत आहे. गतवर्षीप्रमाणे यंदाही मुर्ती तयार करण्यासाठी महागडी मातीची खरेदी करण्यात येत असुन शहरात मुर्तीकार १० ते ५४ फुटांच्या श्री गणेषाच्या मुर्ती बनवताना दिसून येतात. शहरातील सिव्हील लाईन हनुमान मंदिर परिसरात सध्या श्रीकृष्णाच्या मुर्ती बनविण्याचे काम मुर्तीकार कडून सुरू आहे. शहरात पारंपरिक शिल्पकार आहेत. ज्याची उपजीविका त्यावर च अवलंबून आहे. शहरातील सिव्हील लाईन, बाजपेयी वॉर्ड, गौतमनगर, मुर्री आणि इतर अनेक परिसरांमध्ये पारंपरिक शिल्पकार आहेत.

 

जे सध्या आपल्या कामात व्यस्त असल्याचे दिसुन येत आहे. शहरातील काही मुर्तीकारांनी जुन महिन्याच्या सुरूवातीपासुनच मुर्ती बनविण्यास सुरूवात केली आहे. दरम्यान, या मुर्तीकारांचे कुटुंबही या कामात पुर्णपणे गुंतल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांना रोजगार ही मिळाला आहे. विशेष म्हणजे, मुर्तीका हे गावाबाहेरून किंवा शेजारील राज्यांतुन आले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शेतात पडून मृत झालेल्या सुरेशच्या घरी जाऊन उपसभापतीसह अधिका-यांची सांत्वन भेट

Sat Jul 23 , 2022
अमरदिप बडगे , प्रतिनिधी  तिरोडा – तालुक्यातील बाघोली येथील सुरेश छगन वानखेडे यांचे दोन दिवसा अगोदर शेतात रोहिणी चे काम सुरू असतानाच शेतात च मुत्यदेह दिसुन आलेला होता.सुरेश वानखेडे यांच्या परीवाराला शासकीय योजना चा लाभ व सांत्वन करण्यासाठी तिरोडा पंचायत समिती चे उपसभापती हुपराज जमईवार यांनी कृषी विभागाचे अधिकारी जितेंद्र बावनकुळे ,महिला बाल प्रक्लप अधिकारी विनोद चौधरी, यांच्या सह कुंटुबाची विचारपूस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com