गाव हाच परिवार समजून काम करा – आमदार संजय रायमूलकर

संदीप कांबळे, कामठी

– पंचायत राज समितीची कामठी पंचायत समितीला भेट
कामठी ता प्र 8:- ग्रामविकासामध्ये सामूहिकतेची भावना आहे.गावाच्या विकासाशिवाय देशाचा विकास शक्य नाही त्यामुळे सर्वांनी सामूहिकतेची भावना जाणून घेत गाव हाच परिवार समजून सर्वांनी कर्तव्यदक्ष भूमिका साकारावी असे मौलिक प्रतिपादन पंचायत राज समिती चे अध्यक्ष आमदार संजय रायमूलकर यांनी आज कामठी पंचायत समिती ला दिलेल्या पीआरसी दौऱ्याभेटीत व्यक्त केले.तसेच प्रशासकीय अधिकारी , कर्मचाऱ्यांचा लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्यात योग्य समन्वय असणे गरजेचे असून विकासात्मक दृष्टिकोनातून नागरिकांशी थेट संपर्क साधून आंपल्या कामाचे आत्मनिरीक्षण करणे गरजेचे असल्याचे समयोचित मार्गदर्शन सुद्धा केले.याप्रसंगी पंचायत राज समितीतील आमदार शेखर निकम, प्रतिभा धानोरकर, कृष्णा गजवे तसेच प्रतिवेदक शैलेंद्र बोर्डे प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच नागपूर जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर,कामठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, तत्कालीन बीडीओ सचिन सूर्यवंशी प्रामुख्याने उपस्थित होते.
विधिमंडळ निर्मित महाराष्ट्र पंचायत राज समिती आज ८ एप्रिल ला दुपारी 3 दरम्यान कामठी कामठी पंचायत समिती कार्यालयात आगमन झाले .या पंचायत राज समितो चे समितीचे अध्यक्ष आमदार संजय रायमूलकर, आमदार शेखर निकम, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार कृष्णा गजवे , प्रतिवेदक शैलेंद्र बोर्डे यांचा कामठी पंचायत समितो चे महिला गटविकास अधिकारो अंशुजा गराटे, तत्कालीन गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, सभापती उमेश रडके, उपसभापतो आशिष मल्लेवार यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांच्या च्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.तद्नंतर पंचायत राज समितीने पंचायत समितीच्या सभागृहात सर्व विभागाचे अधिकारो व प्रमुख कर्मचारो यांच्याकडील असलेल्या विभागनिहाय कामाचा आढावा घेतला.ज्यामध्ये 28 प्रकारचे प्रश्नावलीवर भर दिला यामध्ये आस्थापना, पंचायत विभाग, कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, आरोग्य विभाग, बांधका म विभाग, शिक्षण विभाग, जलसंधारण विभाग, एकात्मिक बाल विकास प्रकल्प विभाग यासह इत्यादो विभागाचा आढावा घेतला.ज्यामध्ये विशेषता शिक्षण , आरोग्य , महिला व बाल कल्याण विभागाचा विशेष आढावा घेतला आणि प्राप्त झालेल्या खर्चित व आखर्चित अनुदाना बाबत सर्व विभाग प्रमुखाशी चर्चा करून सर्व विभाग प्रमुखांना विकासाबाबत काही मौलीक सुचनाही समितीने केल्यात व पंचायत समितीच्या विकास कामाबाबत समाधान व्यक्त केले. त्यानंतर येरखेडा ग्रा प ला भेट देत ग्रा प च्या कारभाराची पाहणी केली.
याप्रसंगी कामठी पंचायत समितीचे महिला गटविकास अधिकारी अंशुजा गराटे, तत्कालीन गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, पशुधन विकास अधिकारी डॉ लीना पाटील,
गटशिक्षण अधिकारी अधिकारो प्रदीप नागपुरे,प्रकल्प अधिकारो गायगोले,कृषी विस्तार अधिकारी शुभांगी कामडी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने,विस्तार अधिकारी शशिकांत डाखोळे, कनिष्ठ अभियंता विकास बोरकर,आरोग्य विस्तार अधिकारी मनीष दिघाडे,लेखा अधिकारी उघडे, शिक्षण विस्तार अधिकारी कश्यप सावरकर तसेच इतर सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अनाथालयांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार - यशोमती ठाकूर

Fri Apr 8 , 2022
– श्रध्दानंद अनाथालयास सदिच्छा भेट          नागपूर, दि. 8 : अनाथ बालकांचे जीवन सुसह्य करुन, त्यांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी  शासनाव्दारे विविध संगोपन योजना राबविण्यात येत आहेत. अनाथांच्या संगोपनात खासगी अनाथालयांचेही मोठे योगदान आहे. या अनाथालयातील मूलभूत सोयी-सुविधांसाठी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे सांगितले.             श्रध्दानंद अनाथालयास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज सदिच्छा भेट देऊन बालकांना देण्यात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com