महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज नागपुरात

Ø अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची करणार पाहणी

Ø 7 व 8 ऑक्टोबरला नागपूर व चंद्रपूरला आढावा

नागपूर :- राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे दिनांक 7 व 8 ऑक्टोबर रोजी नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

विखे-पाटील हे 7 ऑक्टोबर रोजी दुपारी 1.30 वाजता नागपूर येथे येतील व दुपारी 3.30 पासून काटोल तालुक्यातील कोंढाळी, पाणवडी, येरला, पारडशिंगा येथील नुकसानग्रस्त भागाची पीक पाहणी करतील. सायंकाळी 6 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान, नुकसानीच्या अनुषंगाने ई-पिक पाहणी पीकविमा, गौण खनिज वहिवाट रस्ते, 7/12 संगणकीकरण व लम्पी आदी विषयांवर आढावा घेतील.

दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी मंत्री विखे-पाटील चंद्रपूर जिल्ह्यातील कोलारी, साठवण, भिसी, वहानगाव या चिमूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधतील. तसेच चिमूर उपजिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील.

सायंकाळी 6 वाजता नागपूर येथील रेशमबाग मैदानावर आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो च्या समारोप सभारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून विखे-पाटील उपस्थित राहतील व तद्नंतर रात्री 9 वाजता मुंबईकडे प्रयाण करतील.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महात्मा फुले यांचे वाङ्मय प्रकाशित करणार - मंत्री अतुल सावे

Sat Oct 7 , 2023
Ø एमपीएससी युपीएससी च्या विद्यार्थ्यांना ‘सारथी’प्रमाणे अर्थसहाय्य नागपूर :- महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचारसाहित्य समाजासाठी मार्गदर्शक व प्रेरक आहेत. महाज्योतीमार्फत त्यांचे एकत्रित समग्र वाङ्मय प्रकाशित करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा महाज्योतीचे अध्यक्ष अतुल सावे यांनी केले. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (महाज्योती) संचालक मंडळाची बैठक अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com