”भारत तोडो” ची भाषा करणाऱ्या गुन्हेगाराला काँग्रेसची उमेदवारी,काँग्रेस का हाथ दंगाईयों के साथ – भाजपा आ.प्रवीण दरेकर यांची घणाघाती टीका

मुंबई :- दंगल घडविणे, घातक शस्त्रांचा वापर करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे असे अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या साजिद खान पठाण याला काँग्रेसने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारी देऊन ”काँग्रेस का हाथ, दंगाईयों के साथ ” हेच सिद्ध झाले असल्याची घणाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे विधान परिषदेतील गटनेते आ.प्रवीण दरेकर यांनी शनिवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत आ.दरेकर बोलत होते. भाजपा प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन, प्रवक्ते ओमप्रकाश चौहान हे यावेळी उपस्थित होते. गाजावाजा करत भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून न तुटलेला भारत जोडण्याचे नाटक करणाऱ्या कॉंग्रेसने भारत तोडो ची भाषा करणाऱ्या साजिद खानला उमेदवारी देऊन आपला दुटप्पी चेहरा दाखवला असल्याचेही आ.दरेकर यांनी सांगितले.

आ.दरेकर यांनी यावेळी साजिद खान पठाण याच्याविरुद्ध अकोला शहरातील रामदास पेठ, कोतवाली आणि खदान या तीन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 16 गुन्ह्यांची यादीच वाचून दाखवली. नफरत तोडो नव्हे तर नफरत पसरवणे हाच काँग्रेसचा असली चेहरा आहे अशा शब्दात श्री.दरेकर यांनी काँग्रेसवर शरसंधान साधले. तब्बल 16 गुन्हे दाखल असलेल्या साजिद खान पठाण याला उमेदवारी देऊन काँग्रेसने ‘गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा’ असे धोरण अवलंबले आहे. अकोल्यात झालेल्या दंगलीतील साजिद खान पठाण हा मुख्य आरोपी असून अशा गुन्हेगाराला दिलेल्या उमेदवारीचा भारतीय जनता पार्टी कडवा विरोध करत आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालत काँग्रेस गुन्हेगारांचे उदात्तीकरण करत आहे अशी टीकाही त्यांनी केली. काँग्रेस या दंगेखोराची उमेदवारी मागे घेणार का असा सवालही आ.दरेकर यांनी उपस्थित केला. आ.दरेकर म्हणाले की अशा अट्टल गुन्हेगाराला उमेदवार म्हणून माथी मारत सर्वसामान्य जनतेवर काँग्रेस घोर अन्याय करत आहे. अशा अट्टल गुन्हेगारांना सूज्ञ मतदार त्यांची खरी जागा आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत दाखवून देतील असा विश्वास श्री.दरेकर यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पावर विश्वास ठेवत, जातीपाती व पक्षाच्या पलीकडे जाऊन विकासाच्या मुद्द्यावर जनता आगामी निवडणूक हातात घेणार आहे असेही ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गडकरींना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसच्या महिलांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

Sat Mar 23 , 2024
नागपूर :- काँग्रेस पार्टी च्या नागपूर शहरातील शेकडो पदाधिकारी व महिला कार्यकर्ता यांनी नितीन गडकरी यांचा समर्थनार्थ आज पक्ष कार्यालयात भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. या वेळी भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र (बंटी ) कुकडे व महिला आघाडी अध्यक्षा प्रगती पाटील, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष ( जैन प्रकोष्ट ) रिचा जैन तसेच महामंत्री प्रीती राजदेकर, मनीषा काशीकर, सारिका नांदुरकर, सुषमा चौधरी , […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights