खो-खो – महाराष्ट्राच्या दोन्ही खो-खो संघांची उपांत्य फेरीत धडक

फोंडा :-अपेक्षेप्रमाणे महाराष्ट्रच्या पुरुष व महिला खो-खो संघांनी गटातील तिन्ही सामन्यांत सहज विजय मिळवत उपांत्य फेरीत दिमाखदार प्रवेश केला. मंगळवारी उपांत्य सामन्यात महाराष्ट्र महिला संघाची उपांत्य फेरीत ब-गटात दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या कर्नाटकशी गाठ पडणार आहे.

फोंडा मल्टीपर्पज मैदानावर सुरू असलेल्या खो-खो स्पर्धेत महाराष्ट्र महिला संघाने सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या विजयाची नोंद करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. गटातील तीन्ही सामने जिंकत महाराष्ट्र महिला संघाने गटात अव्वल स्थान कायम राखले.

महिला गटातील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा ४८-२४ असा २४ गुणांनी पराभव करत गटात प्रथम स्थान राखले. महाराष्ट्राकडून प्रियांका भोपिने ३.४० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. पूजा फरगडेने आक्रमणाची चमक दाखवत १० गुण मिळवले. किरण शिंदेने २.३० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले. संपदा मोरेने २.०० मि. संरक्षण करत ६ गुण मिळवले. गुजरात संघाकडून किरण १.२० मि. आणि १.१० मि. संरक्षण केले. तर गोपीने १.३०, १.२० मि. संरक्षण करत २ गुण मिळवले.

महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक आणि ब गटात प्रथम क्रमांकावर राहिलेल्या ओडीसाचा अ गटात दुसऱ्या क्रमांकावरील केरळ बरोबर उपांत्य फेरीचे सामने होणार आहे. आज झालेल्या महिला गटातील अन्य सामन्यात कर्नाटकने हरियाणाचा ५२-४० असा २२ गुणांनी तर केरळने गोव्याचा १२०-१२ असा १०८ गुणांनी पराभव केला.

पुरुष गटात महाराष्ट्राने शेवटच्या साखळी सामन्यात आंध्र प्रदेशवर ७४-३२ असा ४२ गुणांनी सहज विजय मिळवला असला तरी सामन्याला प्रारंभ जोशात झाला. प्रथम आक्रमण करणाऱ्या आंध्र प्रदेशने १६ मिळवण्यात यश मिळवले. यामुळे सामना चुरशीचा होईल असे वाटत होते. मात्र महाराष्ट्रने धारदार आक्रमण करीत आंध्रचे २६ गुणांची कमाई करताना सामना एकतर्फी केला. फैजन पठाणने १.१० मि. संरक्षण करत १६ गुणांची नोंद केली, त्याला साथ देत रामजी कश्यपने १.१०, १.०५ मि. संरक्षण करताना १२ गुण मिळवले. ऋषिकेश मुरचवडेने ८ गुण मिळवले तर अक्षय मासाळने १.२० मि. संरक्षण करताना ६ गुण वसूल केले. आंध्र प्रदेशकडून पी. नरसय्याने १.०० मि. संरक्षण करीत ६ गुण मिळवले. सिवा रेड्डीने १.२० मि. संरक्षणचा खेळ करत आक्रमणात ६ गुण मिळवले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Hockey - Karnataka score three goals in last six minutes to defeat Maharashtra

Tue Nov 7 , 2023
Jugraj Singh’s hat trick in vain; Bronze medal match with Uttar Pradesh today Mhapsa :- With the hat trick of Jugraj Singh, it was almost certain that Maharashtra would beat Karnataka and reach the finals. But Yuvraj Valmiki led Maharashtra’s dream was dashed as Karnataka scored three goals in the last six minutes. Karnataka secured a thrilling 5-4 victory. Now […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com