काटोलात माळी समाजाचा उपवर वरवधू परिचय मेळावा संपन्न

संत सावता माळी संस्थेचा उपक्रम

काटोल :- महात्मा फुले भवन संचेती ले आउट बसस्टँड जवळ काटोल येथे संत सावता माळी संस्था काटोलच्या वतीने सर्वशाखीय माळी समाजाचा उपवर युवकयुवती परिचय मेळावा पार पडला. मेळाव्यात विवाहेच्छुक १८७ मुले व १४२ मुलींनी परिचय दिला. ‘रेशीमबंध’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष पंजाबराव दंढारे तर प्रमुख अतिथी म्हणून समाजप्रबोधक,ग्रामगीताचार्य प्रा.अरुणा सुर्यकांत डांगोरे, सामाजसेवक संजय बारमासे,समाजसेवक नारायणराव अदासे , संत सावता माळी संस्थेचे सचिव रमेश तिजारे, कार्याध्यक्ष रामराव भेलकर, उपाध्यक्ष हितेंद्र गोमासे, सहसचिव रमेश कांबळे, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर बोढाळे,संघटक संजय डांगोरे,संयोजक विजय महाजन उपस्थित होते. संजय डांगोरे,प्रा.विजय महाजन,संजय बारमासे व मुख्य अतिथी प्रा.अरुणा सुर्यकांत डांगोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. चरणसिंग ठाकूर यांनी या उपवर वर – वधू कार्यक्रमाला भेट देऊन माळी समाजसाठी नेहमीच कटिबद्ध आहे असे आपल्या भाषणात सांगितले. त्यांच्या सोबत काठाने  व तानाजी थोटे उपस्थित होते. यावेळी समाजातील अनेक मान्यवरांचा शाल श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. प्रास्ताविक रमेश तिजारे, संचालन किरण डांगोरे, तर आभार मोहन डांगोरे यांनी मानले. मेळाव्यासाठी मोहन डांगोरे, तुलसीदास फुटाणे , हेमंत घोरसे, प्रा. अरविंद तरार, प्रा. पुरुषोत्तम कुबडे, शेषराव टाकळखेडे, धनंजय टेंभे, सारंग तिजारे,आकाश फुटाणे, हितेश भेलकर, प्रशांत पवार, प्रकाश मानेकर, प्रकाश श्रीखंडे, सुनील चोरकर, विद्यानंद वरोकर, किरण डांगोरे, तुलशीदास फुटाणे, विश्वंभर अकर्ते, प्रभाकर देवते, श्रीकांत तडस तसेच वैशाली डांगोरे, स्मिता बेलसरे , भैरवी टेकाडे आदींनी सहकार्य केले. व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com