हक्काच्या ‘स्वप्ननिकेतन’ साठी ११ जुलै पर्यंत मुदतवाढ

– मौजा वांजरा येथे ४८० सदनिकांकरिता अर्ज आमंत्रित

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या झोपटपट्टी पुनर्वसन प्राधिकरणद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मौजा वांजरा, कामठी रोड येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्ननिकेतन’ या प्रकल्पातील सदनिकांच्या विक्रीकरिता नोंदणी करण्यासाठी नागरीकांच्या मागणीवरुन १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून, येत्या ११ जुलै पर्यंत ४८० सदनिकांकरिता अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. मौजा वांजरा, कामठी रोड येथील ‘स्वप्ननिकेतन’ प्रकल्पामधील ४८० सदनिकांकरिता मनपाच्या www.nmcnagpur.gov.in याअधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. यासंदर्भात मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी आदेश निर्गमित केले आहे.

‘स्वप्ननिकेतन’ प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक गरजूंचे हक्काच्या घराचे स्वप्न साकार होणार आहे. यापूर्वी २५ जून पर्यंत अर्ज आमंत्रित करण्यात आले होते. आता यात १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार नागरिकांना ११ जुलै पर्यंत हक्काच्या घरासाठी अर्ज सादर करता येणार आहे. नागरीकांनी या योजनेला उत्त़म प्रतिसाद दिला आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत कामठी रोडवरील पिवळी नदी जवळ मौजा वांजरा येथे उभारण्यात येत असलेल्या ‘स्वप्न निकेतन’ या प्रकल्पाचे कार्य प्रगतीपथावर सुरू असून, या प्रकल्पांतर्गत ४८० सदनिकांची निर्मिती केली जात आहेत. यामध्ये २८.२१ चौ.मी./३०३.६५ चौ. फुट चटई क्षेत्रफळ असलेले 1BHK सदनिका आहेत. सदनिकेची एकूण किंमत ११,५१,८४५ एवढी असून, प्रधानमंत्री आवास योजनेमार्फत शासनातर्फे २,५०,००० रुपये अनुदान असून सदनिकेचे विक्री मूल्य ९,०१,८४५ रूपये आहे. सदनिका खरेदी करण्याकरिता अर्ज नोंदणीसाठी आणखी १५ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अर्जाचे शुल्क २००० रुपये (ना परतावा) ऑनलाईन जमा करावे लागेल. सदनिकांचे वाटप लॉटरी पद्धतीने करण्यात येईल. वाटपाचे अटी व शर्ती आणि अर्ज भरण्याकरिता आवश्यक माहिती www.nmcnagpur.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे. अर्ज करते वेळी कुटुंबातील व्यक्तींचे आधार कार्ड, कुटुंबातील व्यक्तींचे रेशनकार्ड, पॅन कार्ड, मतदान कार्ड यापैकी कोणतेही, बँक पासबुक, दिव्यांग असल्यास प्रमाणपत्र, चालु मोबाईल क्रमांक व इतर दस्तावेज बाळगणे आवश्यक आहे.

प्रकल्पातील ४८० सदनिकांमध्ये ५० टक्के अर्थात २४० सदनिका अराखीव असून १३ टक्के अनुसूचित जाती, ७ टक्के अनुसूचित जमाती, ३० टक्के इतर मागास प्रवर्ग आणि ५ टक्के –समांतर आरक्षण दिव्यांग प्रवर्गाकरिता राखीव आहेत. प्रकल्पामध्ये बाग, कम्यूनिटी हॉल, लॉबी, लिफ्ट आणि पाणी पुरवठा करणा-या पंपला लागणा-रा वीज निर्मितीसाठी सोलर पॅनलची सुविधा, सौर उर्जेमार्फत गरम पाण्याची सुविधा, पर्जन्य जलसिंचन प्रकल्पाची सुविधा, जलनि:स्सारण प्रकल्पाची सुविधा आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार : BRS पक्षात प्रवेश 

Thu Jun 29 , 2023
नागपूर :- माजी मंत्री अनिल देशमुख यांचे समर्थक सुखदेव वंजारी यांच्या नेतृत्वात व BRS नेते प्रविण शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारत राष्ट्र समिती नागपूर शहर प्रविण शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालयातील प्रवेश घेण्यात आला. यावेळी  नारायण निखारे प्रभाग अध्यक्ष ४७, महेश देशपांडे सचिव दक्षिण नागपूर, नितेश अंबरते प्रभाग अध्यक्ष ५०, डॉ.शिरीष मिराशी, परेश मस्के, सुषमा बंगाले दक्षिण नागपूर महिला अध्यक्षा, हेमा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com