वाहन चालकाची अनुज्ञप्ती आता मिळणार ऑनलाईन – परिवहन मंत्री ॲड. अनिल परब

पारदर्शक सेवा देण्यासाठी आधार क्रमांकाचा वापर करुन फेसलेस सेवा

 मुंबई : परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवांपैकी  सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. आता परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यालयात वाहन चालक (लायसन्स) अनुज्ञप्तीचे नुतनीकरणदुय्यम वाहन चालक अनुज्ञप्तीवाहन-चालक अनुज्ञप्तीमधील पत्ता बदलदुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्रवाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी  ना-हरकत प्रमाणपत्रासाठी जावे लागणार नाही. आता या सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

  परिवहन आयुक्त कार्यालयात आज या सहा सेवांचे लोकार्पण मंत्री परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमास परिवहन आयुक्त अविनाश ढाकणेअप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटीलसह परिवहन आयुक्त दिनकर मनवरएनआयसीचे तांत्रिक संचालक दीपक सोनार आदी उपस्थित होते.

            मंत्री परब म्हणालेविभागामार्फत ११५ अनुज्ञप्तीनोंदणी प्रमाणपत्रपरवाना संबंधित सेवा देण्यात येत असूनकेंद्र शासनाच्या सूचनांनुसार ८० सेवा ऑनलाईन असूनआज सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्या आहेत. याचा तब्बल २० लाख लोकांना लाभ मिळेल. पारदर्शक सेवा नागरिकांना मिळावी यासाठी या सेवा आधारकार्डसोबत जोडण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

            अर्जदार अर्जपेमेंट व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करु शकतो. या सेवांचा लाभ घेण्याकरिता  आधारक्रमांकचा वापर करण्यात येणार असूनआधारकार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP पाठविण्यात येणारत्यानंतर  त्याची नोंदणी परिवहन या संकेतस्थळामध्ये केल्यास अनुज्ञप्ती / नोंदणी प्रमाणपत्रामधील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खातरजमा झाल्यानंतरच पुढे अर्ज करणे शक्य होणार आहे. अर्जदाराचे नावपत्ताजन्म तारीख व मोबाईल क्रमांक याची खातरजमा झाल्यामुळे आता पुढील नमुद ६ अर्जाकरिता कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. तसेच नवीन अनुज्ञप्ती (लायसन्स) / नोंदणी प्रमाणपत्र अर्जदारास पोस्टाने पाठविण्यात येणार आहे.

            राज्यामध्ये दुय्यम नोंदणी प्रमाणपत्राकरिता वर्षभरात एक लाख अर्ज प्राप्त होतात. ना-हरकत प्रमाणपत्राकरिता वर्षभरात ३०,००० तरनोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलाकरिता २०,००० अर्ज, (लायसन्स)अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण प्रमाणपत्राकरिता दोन लाख अर्जअनुज्ञप्तीवरील (लायसन्स) पत्ता बदलकरिता दोन लाखाहून अधिक अर्ज प्राप्त होतात. अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणाकरिता १४ लाख अर्ज प्राप्त होतात. आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होणार आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

चंद्रपुर महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिनाबाबत 

Fri Jun 3 , 2022
चंद्रपूर  –  सर्व सामान्य जनतेच्या तक्रारी आणि अडचणींची न्याय व तत्परतेने शासकिय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी  उपाय योजना म्हणून ‘लोकशाही दिन’ चंद्रपूर शहरमहानगरपालिका कार्यालयात  दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजीत केला जातो. त्याचप्रमाणे जुन महीन्यातील  लोकशाही दिन, सोमवार दि. ६ जुन २०२२ रोजी महानगरपालिका कार्यालयात आयुक्त यांचे अध्यक्षतेखाली दुपारी ०१-०० वाजता आयोजीत करण्यात आलेला आहे. लोकशाही दिन प्रसंगी अर्जदारांनी विहीत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com