कांद्री महामार्गावरील दुकानातुन ११ हजार रूपयाच्या मुद्देमाल चोरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री पेट्रोल पंप सामोरील दुकानाचे शटर अर्धवट वाकुन आत प्रवेश करून तांब्याचे ताराचे बंडल सहित एकुण ११,००० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आरोपीचा शोध घेत आहे.
प्राप्त माहिती नुसार गिरीधर नागोराव कोमटी वय ३५ वर्ष राह. बोरी (राणी) यांचे कांद्री पेट्रोल पंप समोर रोडच्या बाजुला सुभाष श्रीराम गिरे यांचे घरी मागील आठ वर्षापासुन भाड्याने दुकान घेतलेले असुन गिरीधर इलेक्ट्रीकल्स अँन्ड सोलर सिस्टम या नावाने आहे. गिरीधर कोमटी हे आपल्या दुकानात मोटार पंप पाण्याचा दुरूस्तीचे काम करीत असुन नेहमी प्रमाणे ते दुकान सकाळी १० वाजता उघडतात व सायंकाळी ७ वाजता बंद करतात. शुक्रवार (दि.१५) जुलै ला गिरीधर कोमटी यांनी नेहमी प्रमाणे रात्री ७ वाजता दुकानाच्या लोखंडी शेटर ला दोन कुलुप लावु न दुकान बंद करून घरी निघुन गेले. शनिवार (दि.१६) जुलै ला सकाळी ६.४५ वाजता दरम्यान गिरीधर कोमटी यांचे घरमालक सुभाष गिरे यांनी फोन करून सांगितले कि “तुझ्या दुकानात चोरी झाली आहे” तेव्हा गिरीधर कोमटी यांनी येवुन पाहिले असता दुकानाचे शटर अर्धवट वाकुन कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटर चे कुलुप तोडुन आत प्रवेश करून ईलेक्ट्रीक दुकानातील मोटार वायंडींग करिता लागणा ऱ्या तांब्याचा ताराचे बंडल एकुण २५ नग प्रत्येकी ६०० रुपये प्रमाणे त्यातील काही अर्धवट बंडल असे एकुण ११,००० रूपयाचे तांब्याचा ताराचे बंडल अज्ञा त चोरट्यांनी चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी गिरीध र कोमटी यांच्या तक्रारी वरून पोस्टे ला अज्ञात आरो पी विरुद्ध ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत असुन आरोपीचा शोध घेत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com