त्याग आणि बलिदानाची मूर्ती म्हणजे मातोश्री रमाई आंबेडकर – वीरेंद्र मेश्राम

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- स्वतःसाठी न जगता बाबासाहेबांना मोठे करण्यासाठी आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून समाजाच्या सेवेसाठी जीवन अर्पण करणाऱ्या महान विभूती मातोश्री रमाई त्यांचा सारखा बलिदान कुणीही करू शकत नाही म्हणून रमाई आंबेडकर ह्या त्याग आणि बलिदानाची मूर्ती आहे.त्यांच्या त्यागाचे आणि बलिदानाचे विचार समाजातील प्रत्येक महिलांनी अंगीकारावे व जीवन समृद्ध करून घ्यावे असे मौलिक प्रतिपादन समता सैनिक दलाचे मार्शल वीरेंद्र मेश्राम यांनी आज 7 फेब्रुवारीला गौतम नगर तसेच रमानगर येथे आयोजित मातोश्री रमाई जयंती कार्यक्रमात व्यक्त केले.

याप्रसंगी मातोश्री रमाई तसेच परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून वंदन करण्यात आले. यावेळी राजेश गजभिये,विकास रंगारी, दिपंकर गणवीर, प्रमोद खोब्रागडे,कोमल लेंढारे, गीतेश सुखदेवें,आशिष मेश्राम, मनोहर गणवीर, सुमित गेडाम, दिनू नागदेवें,मनीष गजभिये, आकाश झोडापे,आदेश,अंकित डोंगरे,मंगेश खांडेकर, अनुभव पाटील,मनीष डोंगरे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमात उपरोक्त नमूद मान्यवरांनी मातोश्री रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून त्यांनी केलेल्या त्यागाची आणि बलिदानाची माहिती समाज बांधवांना दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पॉझिटीव्ह जर्नालिझम अवॉर्डसाठी १५ फेब्रुवारी पर्यंत अर्ज पाठवा !‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे आवाहन

Wed Feb 7 , 2024
मुंबई :- पत्रकारांची देशातील सर्वात मोठी संघटना असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पॉझिटिव्ह जर्नालिझमसाठी पुरस्कारांची घोषणा केलेली आहे. २०२३ पुरस्कारांसाठी प्रवेशिका पाठविण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी आहे.त्यापूर्वी अर्ज पाठविण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. पत्रकारांसाठी चांगले करण्याच्या उद्देशाने राज्यातील २० संपादकांनी एकत्रित येऊन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची निर्मिती झाली आहे. आज जगभरात चाळीस हजारांपेक्षा जास्त सदस्य संख्या असलेली ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ही […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com