चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेने अवैध बांधकामावर कारवाई केली असुन कोनेरी तलाव,बाबुपेठ व नागपूर रोड येथील एकुण ४ बांधकामे जेसीबी व अतिक्रमण पथकाच्या मदतीने काढण्यात आले आहे.      कोनेरी तलाव जवळील जेलच्या मागील परीसरात गफ्फुर वल्द शेख अलमुद्दीन यांचे घराचे अवैध बांधकाम, हुडको कॉलनी बाबुपेठ येथील चरण पोरटे यांचे पहिल्या माळ्यावरील अवैध बांधकाम,सुरेश डाबरे यांचे टिनाच्या शेडचे व बाथरूमचे अवैध […]

नागपूर :-  सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाकरीत प्रभाग क्र. 19 मधील अन्नपूर्णा हॉटेल, गांधीबाग ते अमदीप पंजाबी रेस्टारेंट सी. ए. रोड वाहतुकीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे . हा आदेश 18 मे 2023 पासून 17 जुलै 2023 पर्यंत अंमलात राहील. महानगर पालिका अधिनियम 1949 चे कलम 236 (1) अन्वये सिमेंट काँक्रीट रोड अन्नपूर्णा हॉटेल गांधीबाग ते अमदीप पंजाबी रेस्टॉरेंट सी.ए. रोड वाहतुकीसाठी […]

नागपूर :-  इंदिरा गांधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालयात हज यात्रेकरूसाठी लसीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 24 मे ते 31 मे 2023 पर्यंत लसीकरण सुरू राहणार आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नवीन इमारत (पहिला माळा) बाहयरूग्ण विभाग कक्ष क्रमांक 38 येथे सकाळी 12 ते दुपारी 1 पर्यंत लसीकरण करण्यात येईल. या लसीकरणाचा लाभ जास्तीत जास्त यात्रेकरूंनी घ्यावा, असे आवाहन […]

– सावनेर येथे घेतला विविध योजनांचा आढावा. – वीज जोडणीबाबत उपमुख्यमंत्री आग्रही नागपूर :- शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्य माणसांपर्यंत प्रभावीपणे पोहोचण्यासाठी आणि या योजनांना गती देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, या योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्यात. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सावनेर येथील तहसिल कार्यालयात आज कळमेश्वर आणि सावनेर तालुक्याची आढावा […]

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- काल 18 मे ला संपन्न झालेल्या कवठा व लोंणखैरी ग्रामपंचायतच्या प्रत्येकी रिक्त एक जागेसाठी झालेल्या मतदानाची आज 19 मे ला कामठी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मुख्य उपस्थितीत मतमोजणी करण्यात आली. या मतमोजणी निकालानुसार लोंणखैरी ग्रा प च्या प्रभाग क्र 1 च्या रिक्त जागेसाठी सर्वसाधारण महिला प्रवर्गातून कविता शेषराज जामगडे […]

-बॅटरी कार अन् ट्राली बॅगने कुलींचे जीवन संकटात नागपुर :- कुली या चित्रपटाने प्रसिध्दीच्या झोतात आलेल्या कुलींसमोर जगण्याचा आणि कुटुंबाला जगविण्याचा प्रश्न भेडसावित आहेत. पोट भरणेच कठीन झाले तर मुलांना शिकविणार कसे? असा प्रश्न कुलींंसमोर आहे. तंत्रज्ञानाने प्रगती तर केली मात्र, कुलींच्या हातातील रोजगार हिरावला. रेल्वेची धडधड. प्रवाशांची वर्दळ आणि कुलींची धावपळ, असे दृष्य रेल्वे स्थानकावर असते. रेल्वे म्हणजे अद्भूत […]

नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (18) रोजी शोध पथकाने 66 प्रकरणांची नोंद करून 72600 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

– अकोला ते नागपूर प्रवासादरम्यान घटना -पावनेदोन लाखांच्या मंगळसुत्रासह सोनसाखळी आणि रोख चोरी नागपूर :-अकोला ते नागपूर प्रवासादरम्यान अज्ञात चोराने हॅण्ड बॅगमधून पावनेदोन लाखांच्या मंगळसुत्रासह सोनसाखळी आणि रोख चोरून नेली. ही घटना अजमेर-पुरी एक्सप्रेसमध्ये घडली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. हिना पिंपळकर, रा. अयोध्यानगर असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. हिना त्यांच्या दोन मुलांसह कौटुंबिक समारंभासाठी अकोला येथे गेल्या […]

– पावसाळ्यापूर्वी समस्या प्रतिबंधाची पूर्वतयारी  वाडी :- पावसाळ्याच्या दिवसात वाडी न.प.क्षेत्रातील सांडपाणी वाहून जाणारे लहान -मोठे नाले दुथडीभरून वाहत असतात, महापूर आल्यास तेच पाणी रस्त्यावर येऊन परिसरातील घरात, दुकानात शिरून अंतर्गत मार्ग व महामार्गावर पाणी साचल्याने अनेक नागरिकांना व वाहतूक दारांना त्रास सहन करावा लागतो त्याची दखल घेऊन पूर्वनियोजना नुसार नप. चे मुख्याधिकारी डॉ.विजय देशमुख यांनी एक बैठक घेवून आपत्ती […]

– ‘सायकल फॉर नागपूर’ लोगोचे आयुक्तांच्या हस्ते अनावरण नागपूर :- ‘जागतिक सायकल दिना’च्या निमित्ताने ३ जून २०२३ रोजी सकाळी ६ वाजता नागपूर महानगरपालिकेतर्फे शहरातील सायकलपटूंच्या सहकार्याने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. या रॅलीच्या अनुषंगाने गुरूवारी (ता. १८) मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी सायकल रॅलीचे ‘सायकल फॉर नागपूर’ लोगोचे अनावरण केले. यावेळी उपायुक्त सुरेश बागडे, शहराचे बायसिकल मेअर […]

– एक शेतकरी म्हणून कर्तव्य बजावले – बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू झाल्याबद्दल प्रतिक्रिया नागपूर :- सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीवरील बंदी पुन्हा एकदा उठवून महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आनंद द्विगुणित केला आहे. ही बंदी उठल्यामुळे समस्त शेतकरी वर्गाकरिता आनंदाचा क्षण ठरलेला आहे. असे वक्तव्य राज्याचे माजी पशुसंवर्धन मंत्री आमदार सुनील केदार यांनी केले. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरील बंदी बाबत दाखल […]

Mumbai :- Maharashtra Governor Ramesh Bais accompanied by Rambai Bais felicitated the Divyang medallists who won medals for India at the 10th International Abilympics at Raj Bhavan Mumbai. The felicitation was organised by the Bal Kalyan Sanstha Pune which is working for the holistic development of divyang students. Chetan Pashilkar (Painting and Waste Reuse), Priyanka Dabade (Embroidery), Bhagyashree Nadimetala – […]

नागपूर :-परिचय बहुउद्देशीय संस्था नागपूरच्या वतीने पत्रपरिषद संबोधित करतेवेळी अनघा वेखंडे, शोभा बावनकर, अंजली पारधी, अनंत पारधी, दिलीप पोहरे आणि वीरेंद्र मेश्राम यांची मंचावर उपस्थित होती. येत्या शनिवारी देशपांडे सभागृहात मराठीचा सांस्कृतिक वारसा हा कार्यक्रम चैत्रापासून तर फाल्गुना पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सणांचं महत्त्व या कार्यक्रमात नमूद केलं आहे. यासंदर्भात ” मराठीचा सांस्कृतिक वारसा ” हा कार्यक्रम बघण्यास विसरू नका असे […]

मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या विकास कार्यक्रमासंबधित खर्चासाठी पाच वर्षे मुदतीचे 3 हजार कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा वापर शासनाच्या विविध विकास कार्यक्रमासंबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे, अशी माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. या कर्ज उभारणीस केंद्र सरकारची मान्यता घेण्यात आली असून ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन […]

– दिलखुलास कार्यक्रमात पृथ्वीराज बी. पी. यांची मुलाखत मुंबई :- “राज्य शासनामार्फत जनकल्याणासाठी विविध योजना राबविण्यात येतात. या योजनांचा लाभ तळागाळातील गरजू नागरिकांपर्यत पोहोचावा, या अनुषंगाने ‘आयुष्यमान भारत’ योजनेंतर्गत ‘आरोग्यवर्धिनी’ व त्या बरोबर जिल्ह्याच्या आर्थिक उन्नतीसाठीचे प्रकल्प या सर्व उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करून लातूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठीचे नियोजन केले असल्याचे लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून सांगितले आहे. […]

मुंबई :- सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील दौलतनगर येथे दि.१३ मे रोजी या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. सातारा जिल्ह्यात शासन आपल्या दारी अंतर्गत २७ हजार पात्र लाभार्थींना लाभ […]

अरोली :- अंतर्गत १० किमी अंतरावर मौजा खरडा शिवार येथे दिनांक १७/०५/२०२३ मे ०६/०० वा. ते ०६/४५ वा. दरम्यान पोलीस स्टेशन अरोली येथील स्टाफ यांना गोपनिय बातमीदारांकडुन माहिती मिळाली की, एक इसम मौजा खरडा शिवार येथे सुर नदीचे पात्रातून अवैधरीत्या विनापरवाना रेतीची वाहतुक करीत आहे अशा मिळालेल्या माहिती वरून अरोली पोलीस पथक नमुद घटनास्थळी गेले असता आरोपी नामे- संजय भगवान […]

नागपूर :- दिनांक १९/०५/२०२३ रोजी शुक्रवार दुपारी ०१.३० वा. नागपूर ग्रामीण जिल्हयातील पोलीस स्टेशन काटोल व नरखेड येथील नूतन पोलीस स्टेशन इमारतीचे तसेच पोलीस स्टेशन कुही, पारशिवनी, खापा येथील नूतन शासकीय निवासस्थाने उद्घाटन सोहळा देवेद्र फडणविस उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांचे शुभहस्ते पोलीस स्टेशन काटोल येथे आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती खासदार कृपाल तुमाने, आमदार प्रविण दटके,  आमदार […]

संदीप बलवीर,प्रतिनिधी  – युवक काँग्रेस व एकता कामगार संघटनेचे अनोखे लक्षवेधी आंदोलन  नागपूर :- बुटीबोरी औधोगिक क्षेत्रात कित्येक वर्षा पासून प्रलंबित असलेल्या विम्याच्या दवाखान्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने ते जलद गतीने व्हावे व कामगारांना अत्याधुनिक व जलद सेवा मिळावी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व एकता कामगार संघटनाच्या संयुक्त विद्यमाने दि.18 मे ला महाराष्ट राज्य प्रदेश काँग्रेस महासचिव मुजीब […]

नागपूर :- शासकीय वसतिगृहासाठी पात्र असतानाही संख्येअभावी प्रवेश न मिळू शकणाऱ्या विद्यार्थ्यांना रुमभाडे व भत्ता देणाऱ्या लोकप्रिय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेत नागपूर जिल्ह्याने विक्रमी 7 हजारावर विद्यार्थ्यांना लाभ दिला आहे. यासाठी शासनाकडून 25 कोटी निधी मिळाला असून शासन आपल्या दारी अभियानात याचे वितरण सुरु झाले आहे.साहाय्यक समाज कल्याण आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार सन 2021-22 व 2022-23 मधील […]

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!