संदीप बलवीर,प्रतिनिधी
– युवक काँग्रेस व एकता कामगार संघटनेचे अनोखे लक्षवेधी आंदोलन
नागपूर :- बुटीबोरी औधोगिक क्षेत्रात कित्येक वर्षा पासून प्रलंबित असलेल्या विम्याच्या दवाखान्याचे काम संथ गतीने सुरु असल्याने ते जलद गतीने व्हावे व कामगारांना अत्याधुनिक व जलद सेवा मिळावी म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व एकता कामगार संघटनाच्या संयुक्त विद्यमाने दि.18 मे ला महाराष्ट राज्य प्रदेश काँग्रेस महासचिव मुजीब पठाण यांच्या मार्गदर्शनात व महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात विम्याच्या दवाखान्याच्या नियोजित जागेवर बेशरम वनास्पती चे झाडे लावून केंद्र व राज्य सरकार च्या विरोधात अनोखे व लक्षवेधी आंदोलन करन्यात आले. यावेळी दवाखान्याच्या जागेवर प्रतिकात्मक स्वरूपात रुग्णाला खाटेवर झोपवून उपचार करण्यात आले.
बुटीबोरी औधोगिक क्षेत्र स्थापन होऊन आज जवळपास 34 वर्षाचा काळ लोटून गेला आहे. या कालावधीत येथे हजारो अपघात झाले असुन त्या अपघातात शेकडो लोकांचे जीव गेले आहे. त्यातल्या त्यात औधोगिक क्षेत्रातील लाखो कामगार महिन्याकाटी 5.5% च्या हिशोबाने करोडो रुपया ईएसआयसी ला भरत असतांना विम्याचे हॉस्पिटल बनण्यासाठी ऊशीर का? असा प्रश्न मुजीब पठाण यांनी उपस्थित केला आहे.10 वर्षांपूर्वी तत्कालीन काँग्रेस सरकारने बुटीबोरी औधोगिक क्षेत्रात 200 खाटाचे विम्याचे हॉस्पिटल मंजूर केले होते. व त्याकरिता आवश्यक निधी सुद्धा मंजूर केला होता. दरम्यान केंद्र व राज्यातील सरकार बदलले तेव्हा पासून 9 वर्षाचा काळ उलटून गेलं तरी शासन व प्रशासनाच्या कामगारांप्रति असलेल्या उदासीन धोरणामुळे विम्याच्या दवाखान्याचे काम नुसते खड्डे खोदून ठेवन्या पलीकडे गेलेले नाहीं.
बुटीबोरी औधोगिक क्षेत्रात नियोजित विम्याच्या दवाखान्याचे काम झाले तर विदर्भातील सर्व ई एस आय सी मधील नोंदणीकृत कामगार व त्यांच्या परिवाराला स्वास्थ सुविधा मिळेल.बुटीबोरी येथे असलेल्या विम्याच्या डीस्पेंसारित अनेक सुविधाचा आभाव असून येथे वेळेवर डॉक्टर, कर्मचारी तर कधी औषधे उपलब्ध नसल्याने लहान सहान बिमारीकरिता नागपूरला पाठविले जाते.तर सोमवारी क्वार्टर ला असलेल्या विम्याच्या दवाखान्याची सुद्धा वेगळी परिस्थिती नसल्याने तिथून सुद्धा शासकीय रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे अनेकदा रुग्ण रस्त्यातच आपला जीव सोडत असतो. अश्या घटना नवीन नसून नित्याच्याच झाले असल्याने तीन महिन्यांपासून बंद असल्याल्या विम्याच्या दवाखान्याचे काम त्वरित सुरु करून दवाखाना जनतेसाठी उपलब्ध करून द्यावा याकरिता महाराष्ट्र राज्य काँग्रेस कमिटीचे महासचिव मुजीब पठाण यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र राज्य युवक काँगेस अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नेतृत्वात शासन व प्रशासनाने च्या विरोधात विम्याच्या दवाखान्या करीता खोदलेल्या खड्ड्यात बेशरम ची झाडें लावून निषेध व्यक्त केला. या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी महासचिव मुजीब पठाण, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष कुणाल राऊत,बाबू पठाण, सुधीर देवतळे, आशिष वरघने, युसूफ शेख,सुधाकर कैकाडी, गजानन गावंडे,नासिर शेख, नागेश गिऱ्हे, विलास येसनसुरे, राहुल पटले, आशिष मडपे, मिथिलेश कन्हेरे, आश्विन बैस, सलील वासे, गुड्डू लोणारे, श्रावण देवतळे व युवक काँग्रेस चे कार्यकर्ते व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष बाब अशी कि दिनशा कंपनीतील कामगार भूषण पन्नासे यांना ई एस आय सी ने रेफर केलेल्या दवाखान्याचे मागील न दिल्याने त्यांचेवर उपचार करण्यास मनाई केली. त्यावेळी त्यांना तातडीच्या उपचाराची गरज होती. परंतु वेळेवर उपचार न मिळाल्याने सदर कामगारांचा मृत्यू झाला. सबब कामगारांच्या मृत्युला ई एस आय सी जवाबदार असून ई एस आय सी चे अधिकारी यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन नागपूर जिल्हा पोलीस उपायुक्त यांना बुटीबोरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक भीमाजी पाटील यांचे माध्यमातून देण्यात आले.